छत्रपती संभाजीनगर

पतीवर मृत्‍यूचे सावट असल्याचे सांगून मांत्रिकाचा विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्‍याचार

पुणे, दि. १३ ः तुझ्या पतीवर मृत्‍यूचे सावट असून, त्‍यावर उपाय म्हणून व्हिडिओ कॉल करत निर्वस्‍त्र होण्यास मांत्रिकाने सांगितले. नंतर या व्हिडिओ कॉलचे स्क्रिनशॉट घेऊन त्याने तिला ब्लॅकमेल केले व वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीवरून पुण्याच्या मंचर पोलिसांनी मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम नामदेव गायकवाड (रा. बुरुडगाव रोड, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच तो फरारी झाला आहे. पीडित विवाहितेची विक्रमसोबत जानेवारी महिन्यात ओळख झाली होती. त्याने तिला सांगितले, की तो मोठा मांत्रिक व ब्रह्मचारी आहे.

तुझ्या पतीवर मृत्यूचे सावट असून, त्यावर उपाय म्हणून व्हिडिओ कॉल करून निर्वस्‍त्र व्हावे लागेल. महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवून व्हिडिओ कॉल करून निर्वस्‍त्र झाली. या व्हिडिओ कॉलचे स्क्रिनशॉट काढून ते व्हायरल करण्याची धमकी त्याने विवाहितेला दिली व लैंगिक अत्याचार करत राहिला.

जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तिच्या शरीराचे लचके तो तोडत राहिला. अखेर तिने आता मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वॉचमन तरुणीवर बलात्कार
सुरक्षारक्षक असलेल्या २७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून ती प्रेग्नंट राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तरुणीच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिसांनी तिच्या २३ वर्षीय मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलिसांकडे हा गुन्हा तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

राकेश अंकुश विटकर (, रा. आपले घर सोसायटी जवळ, सर्यप्रकाशनगर, खराडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. डिसेंबर २०१८ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत गुन्हा घडल्याचे तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कवितके करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!