छत्रपती संभाजीनगर
Trending

नशेच्या गोळ्या (बटन) व सिरप (चिप्पा)ची विक्री करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद ! छत्रपती संभाजीनगरमधील आसेफिया कॉलनीत छापेमारी !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४- छत्रपती संभाजीनगरमधील आसेफिया कॉलनीत छापेमारी करून नशेच्या गोळ्या (बटन) व सिरप (चिप्पा) ची विक्री करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला. सदर आरोपीवर शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण १० गुन्हे दाखल आहेत. Codefine Syrup 50 नग बॉटल आणि Codipan syrup नावाच्या 150 नग बॉटल अशा एकूण 200 बॉटल (चिप्पा) मिळून आल्या. तसेच Nitrosun-10 नावाच्या 100 नग गोळ्या (बटन) असा एकूण 30,650/- रु. किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक, 23/11/2023 रोजी गुन्हे शाखेस गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, शेख नदीम शेख नईम (वय 30 वर्षे, रा. टाउन हॉल, आसेफिया कॉलनी, संजय जगताप यांच्या कार्यालयाजवळ, छत्रपती संभाजीनगर) हा त्याच्या राहते घरातून नशेसाठी वापर होणाऱ्या गुंगीकारक गोळ्या व सिरपची विनापरवाना बेकायदेशीर रित्या विक्री करीत आहे.

त्यावरून एन.डी.पी.एस. पथक, गुन्हे शाखा यांनी सदर ठिकाणी पंच व औषध निरीक्षक यांच्यासह छापा टाकला. सदर छाप्यादरम्यान शेख नदीम शेख नईम याच्या ताब्यात Codefine Syrup 50 नग बॉटल आणि Codipan syrup नावाच्या 150 नग बॉटल अशा एकूण 200 बॉटल (चिप्पा) मिळून आल्या. तसेच Nitrosun-10 नावाच्या 100 नग गोळ्या (बटन) असा एकूण 30,650/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरुध्द बेगमपुरा पोलिस ठाणे येथे भा.दं. वि. कलम 328, 276 सह गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनियम 1985 कलम 8 (c), 22 (b), 29 सह कलम 18 (A), 18 (c), 27 (b) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे दिनांक 20/10/2023 रोजी आरोपी शेख नदीम शेख नईम याचे दोन भाऊ नामे शेख नव्वर शेख नईम व शेख चॉदपाशा शेख नईम यांच्यावर एन.डी.पी.एस. पथकाने सिरप बॉटल विक्री करताना पकडून त्यांच्यावर पोलिस ठाणे बेगमपुरा येथे गुन्हा दाखल असून त्याच गुन्ह्यात सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तसेच आरोपी शेख नदीम शेख नईम याच्या विरुध्द छत्रपती संभाजीनगर येथे विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त तथा विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, सपोआ गुन्हे धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा संदीप गुरमे, यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक, सुधीर वाघ, पोलिस उप निरिक्षक विशाल बोडखे, सफौ सतीश जाधव पो. अं. प्रकाश डोंगरे, संजयसिह राजपुत, विठ्ठल सुरे, हैदर शेख, राहुल खरात, धर्मराज गायकवाड, दत्ता दुभळकर, प्रिती इलग यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!