महाराष्ट्र
Trending

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, एसबीव्हीकेएसचे सोमवारपासूनचे उपोषण मागे !

नांदेड दि. 23 – वीज वितरणमधील कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे म. रा. स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे म्हणजे एसबीव्हीके एसचे सोमवार दि. 24 पासून सुरू होणारे आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.

संघटनेचे सर्कल सचिव एस. एस. टिप्परसे यांनी ही माहिती दिली. वीज कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी दि. 24 पासून विद्युत भवनसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यांनंतर अधीक्षक अभियंता यांच्या दालनात चर्चा झाली.

या बैठकीला प्रशासनातर्फे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव मॅनेजर आंबेकर मुख्य लिपिक कविता कांबळे तर संघटनेतर्फे झोन सचिव एस. बी. बुकतरे सर्कल सचिव सुनील टिप्परसे यांनी भाग घेतला होता.

या बैठकीत अधीक्षक अभियंता यांनी काही मागण्या मान्य केल्या. पण काही मागण्यांबाबत वरीष्ठ यांच्याकडून मार्गदर्शन मागवण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी दिले. त्यामुळे सदर उपोषण मागे घेण्यात आल्याचे असे सर्कल सचिव टिप्परसे यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!