छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

फुलंब्रीच्या डॉक्टरला सिडको उड्डान पुलावर अपघात ! रोड रोलर आणि स्विफ्ट कारची धडक !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – फुलंब्री येथील डॉक्टरची स्विफ्ट कार आणि रोड रोलरचा सिडको उड्डानपुलावर अपघात झाला. या अपघातात डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री अडीच ते तीन वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील सिडको उड्डान पूल परिसरात ही घटना घडली.

शैलेंद्र प्रकाश बाधले (वय ३६, रा. अलोकनगर, देवळाई, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे.

डॉक्टर शैलेंद्र प्रकाश बाधले यांना आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात डॉक्टर शैलेंद्र प्रकाश बाधले यांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, त्यांच्यावर  रुम नंबर 205 मध्ये उपचार सुरु आहेत. शैलेंद्र बाधले हे सरकारी डॉक्टर म्हणून फुलंब्री येथे काम करतात. येण्या जाण्यासाठी मारुती स्विफ्ट कार (क्रमांक. MH-20-EE-9851)  आहे.

दिनांक 20/04/2023 रोजी रात्री 02.30 ते 03.00 वाजेच्या सुमारास डॉक्टर शैलेंद्र प्रकाश बाधले हे फुलंब्री येथून त्यांचे काम आपटून कार (क्रमांक MH-20-EE-9851) ने क्रांतीचौक येथे जात असताना उड्डाणपुलावर एका रोड रोलर चालकाने रोड रोलरवर रॉंग साईडने घेवून कारला धडक दिली. या अपघातात डॉक्टर शैलेंद्र प्रकाश बाधले यांच्या उजव्या बाजुच्या दोन फासळ्या फॅक्चर झाल्या. सध्या डॉक्टर शैलेंद्र प्रकाश बाधले यांच्यावर आनंदी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी डॉक्टर शैलेंद्र प्रकाश बाधले यांच्या तक्रारीवरून रोड रोलर चालकावर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास होह भिडे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!