गावठी पिस्टलसह बदनापूरमधून एकाला पकडले, ५० हजारांत कट्टा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! शेलगाव येथे घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- बदनापूर तालुक्यातील राजेवाडीतील एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून त्या युवकाला गावठी कट्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गावठी कट्टा विकणार्या व मध्यस्थी करणार्या टोळीपर्यंत पोलिस पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक जण फरार असल्याची माहिती मिळाली. शेलगाव येथील राहत्या घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर केले असल्याची धक्कादायक माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिस या गावठी कट्ट्याच्या टोळीचे व पाळेमुळे खणून काढत आहेत.
सुभाष विनायक डोलारे (रा. राजेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना), अमोल राजेंद्र देशमुख (रा. शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना), सोनु संतोष जाधव (रा. नूतन वसाहत, जालना), आकाश उर्फ भाऊ कल्याण जाधव (फरार) (रा. कांबळेगल्ली, संभाजीनगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
पोहेकॉ कृष्णा आण्णा तंगे (स्थानिक गुन्हे शाखा जालना) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 17.10.2023 रोजी 16.00 वाजता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुभाष विनायक डोलारे (रा. राजेवाडी ता. बदनापूर जि. जालना) यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. ही खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोलिस पथक सेलगाव परिसरात त्याचा शोध घेत असताना तो शासकीय रुग्नालय शेलगाव समोरील मोटार सायकल दुरुस्ती गॅरेजवर 16.45 वाजता मिळून आला.
पोलिसांनी त्यास विश्वात घेऊन गावठी पिस्टलाबाबत विचारणा केली असता त्याने गावठी पिस्टल हे गॅरेजमध्ये ठेवलेले असून मी ते काढून देतो, असे सांगितले. त्यानुसार एक गावठी बनावटीचे पिस्टल (आग्निश्स्ञ) लोखंडी धातुचे मॅगझीन व एक जिवंत काडतुस मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी सुभाष विनायक डोलारे यास गावठी पिस्टल व जिवंत काडतूसबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे हे सुभाष डोलारे याचा मित्र सोनु संतोष जाधव (रा. नूतन वसाहत जालना) यांच्या मध्यस्तीने जालना येथील आकाश उर्फ आऊ कल्याण जाधव (रा. कांबळेगल्ली संभाजीनगर जालना) यांच्याकडून रुपये 50000/- मध्ये विकत घेऊन अमोल देशमुख (रा. शेलगाव ता. बदनापुर जि. जालना) याला रुपये 55000/- मध्ये विकले होते.
त्यानंतर अमोल देशमुख (रा, शेलगाव ता. बदनापुर जि. जालना) याने सदर गावठी पिस्टल मधून दोन जिंवत काडतूस फायर करून ते पुन्हा सुभाष डोलारेला परत केले. त्यामुळे अमोल राजेंद्र देशमुख (वय 29 वर्षे रा. शेलगाव ता. बदनापुर जि. जालना) यांचा शोध घेतला असता तो त्यांच्या राहत्या घरी मिळुन आल्याने त्यास गावठी पिस्टल बाबत विश्वासात घेऊन विचारणा करता त्याने गावठी पिस्टल मधून त्याच्या राहते घरावरील गच्चीवरून दोन राऊंड फायर केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी सोनु संतोष जाधव (रा. नूतन वसाहत जाधव) येथे शोध घेतला असता तो नूतन वसाहत परिसरामध्ये मिळुन आल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदर गावठी पिस्टल मधून दोन जिवंत काडतुस आकाश उर्फ आऊ कल्याण जाधव यांच्याकडून घेऊन सुभाष डोलारे याला 50000/- रु. विकत घेऊन देणे करिता मदन केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आकाश उर्फ आऊ कल्याण जाधव (रा. कांबळेगल्ली संभाजीनगर जालना) यांचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
तिघांच्या ताब्यातील मोबाईल हे गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष विनायक डोलारे (रा. राजेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना), अमोल राजेंद्र देशमुख (रा. शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना), सोनु संतोष जाधव (रा. नूतन वसाहत, जालना), आकाश उर्फ भाऊ कल्याण जाधव (फरार) (रा. कांबळेगल्ली, संभाजीनगर, जालना) यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe