छत्रपती संभाजीनगर
Trending

वैजापूर तालुक्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या, छत्रपती संभाजीनगरातून मालकाचे ७ लाख घेऊन पळाला होता, सिडकोतून उचलले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- नोकराने फसवणूक करून नेलेले 7,00,000/- रुपये आरोपीकडून गुन्हे शाखेने केले जप्त. मालकाने शेंद्रा एमआयडीसीतील कंपनीत देण्यासाठी दिलेले ७ लाख रूपये कंपनीत न देता ती रक्कम घेवून तो पळून गेला होता. सदर आरोपी हा मूळचा वैजापूर तालुक्यातील असून जयभवानीनगर परिसरात तो भाड्याच्या घरात राहतो. सिडको परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या घराची झडती घेतली असता रकम मिळून आली.

नामदेव गोविंद जाधव (वय 39 वर्षे ह.मु. के. एस. भोकरे यांचे घरात भाड्याने, प्लॉट नंबर एफ-41, गल्ली नंबर 3, जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर, मुळ पत्ता रा. मनोली ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रितम नरेंद्र खिवंसरा (रा. एन-1, सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिनांक 16/07/2023 रोजी फिर्याद दिली की, ड्रायव्हर नामदेव गोविंद जाधव यास मी दिनांक 14/07/2023 रोजी 7,00,000/- रुपये विश्वासाने देवून शेंद्रा एमआयडीसी, येथील आमच्या अलाईन कंम्पोन्टस् प्रा.लि. मध्ये देणे बाबत सांगितले. परंतु पैसे न देता तो पळून गेला. या प्रकरणी पो.स्टे. एम. सिडको गुरनं 333/2023 कलम 408,420 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दिनांक 18/07/2023 रोजी गुन्हे शाखेला माहीती मिळाली की, या गुन्हयातील आरोपी नामदेव गोविंद जाधव हा सिडको बसस्थानक परिसरात असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या या माहितीवरून सपोनि शिंदे व पथक यांनी सदर ठिकाणी जावून आरोपीस ताब्यात घेतले. जयभवानी नगर, ग.नं. 3 येथील त्याच्या राहते घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 7,00,000/- रोख (सात लाख रुपये रोख ) गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला. आरोपी नामदेव गोविंद जाधव (वय 39 वर्षे ह.मु. के. एस. भोकरे यांचे घरात भाड्याने, प्लॉट नंबर एफ-41, गल्ली नंबर 3, जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर, मुळ पत्ता रा. मनोली ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) व मुद्देमाल यांना पोलिस स्टेशनला आणले. पो.स्टे. एम. सिडको गुरनं 333/2023 कलम 408, 420 भादवि हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शाना खाली सपोनि मनोज शिंदे, पोह चंद्रकांत गवळी, पोना नवनाथ खांडेकर, पोकॉ विशाल पाटील, पोकॉ विलास मुठे, पोकॉ नितीन देशमुख, मपोकॉ अनिता त्रिभुवन, चालक पोअं अजय चौधरी यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!