महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण, वीजपुरवठा तोडला म्हणून राग काढला !
दोघांवर क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ : नूतन कॉलनीजवळच्या बडा तकिया येथे थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित केला म्हणून दोघांनी महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास मारहाण करून विद्युत सहायकास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या क्रांती चौक शाखा कार्यालयात काम काम करणारे विद्युत सहायक ऋषीकेश केरे व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी फैसल मकरानी हे मंगळवारी (18 जुलै) दुपारी 12 वाजता थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी बडा तकिया परिसरात गेले होते. करीम महेबूब या ग्राहकाकडे वीजबिलाची 13 हजार रुपये थकबाकी असल्याने विद्युत खांबावरून विद्युतपुरवठा खंडित केला.
या ठिकाणी वीजवापर करणाऱ्या आलीम हरून कुरेशी व एका अनोळखी व्यक्तीने आमचा वीजपुरवठा खंडित का केला म्हणत मकरानी यांना शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच केरे यांनाही शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत जखमी झालेले मकरानी यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेऊन क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी आलीम हरून कुरेशी व अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe