अदालत रोड, पैठण गेट परिसरात 82 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले ! मनपा पथकाची धडाकेबाज कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, दि 30 डिसेंबर – महानगरपालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक १ प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली आज दोन ठिकाणी एकूण ८२ अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक च्या बाजुला, अदालत रोड येथे १५० मिमी मुख्य वितरण जलवाहिनी वरील आणि २) पैठण गेट येथे १५० मिमी जलवाहिनी वरील मिळून एकूण ८२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
ही कारवाही उप अभियंता मिलिंद भामरे, पथक अभियंता रोहीत इंगळे, अभियंता किरण तमनार, अभियंता सचिन वेलदोडे, अभियंता सुमित बोराडे, अभियंता एस.एस. गायकवाड आणि इतर कर्मचारी मोहम्मद शरीफ, तमिज पठाण, वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार, उमेश दाणे आदींनी पार पाडली.