छत्रपती संभाजीनगर
Trending

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा २०० कोटींचा घोटाळा: आजच्या मोर्चाला पोलिसांनी या अटींवर दिली परवानगी, ५०० ते ६०० ठेवीदारांनी संचालकांविरोधात दंड थोपटले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – सहकाराच्या नावाखाली स्व:हाकारामुळे संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०० कोटींचा घोटाळा करणार्या सर्व संचालकांच्या विरोधात दिनाक १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आसल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली. दरम्यान, पोलिसांनी काही अटींवर या मोर्चास परवानगी दिली आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याचे समोर आल्याने सर्व ठेवीदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या पतसंस्थेत शहरासह तालुक्यातील सर्व शाखांमध्ये हजारो ठेवीदारांचे शेकडो रुपये अडकले आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून मागणी करूनही ठेवीदारांना पतसंस्थेकडून पैसे देण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. ठेवीदार पतसंस्थेच्या शाखांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापकांकडून ठेवीदारांना तारीख देऊन तुम्हाला पैसे अमुक तारखेला तमूक तारखेला मिळतील असे सांगून टाळाटाळ केली जात आहे. गोरगरीब, कष्टकरी, वयोवृध्द नागरिक तसेच शेतकरी बांधवांना त्यांच्या आयुष्याची जमापुंजी मिळवून देण्यासाठी सर्वांनी पक्ष भेदभाव विसरून धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यानी केले आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे सध्या अटकेत आहेत.

पोलिसांवर दबाव ? मोर्चा निघणार म्हणजे निघणारच ! – खासदार जलील
लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे. येथे आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी केलेल्या फसवणुकीमुळे शेकडो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले आहेत आणि पोलिस सांगतात की ते मोर्चा काढू शकत नाहीत. कारण त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. हे काय मूर्खपणाचे कारण आहे? पोलिसांनी कधी कोणत्या राजकीय पक्षाचा मोर्चा याच कारणासाठी रोखला का ? मग आता का ? फक्त ते असहाय्य लोक आहेत जे त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी लढत आहेत. पोलिसांवर दबाव आहे का ? मोर्चा निघणार आहे. क्रांती चौक – 17 जुलै – सकाळी 11 वाजता, असे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील या मार्गांवरून पोलिस आयुक्तालयावर धडकणार मोर्चा- पल्लवी काथार, संतोष वैद्य, विजय सपकाळ, रघुनाथ वीर, दादा सय्यद यांच्या नेतृत्वात आदर्श नागरी सहकारी पथसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समिती यांच्या वतीने दिनांक २७/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. क्रांतीचौक, सिल्लेखाना, पैठणगेट, बाराभाईताजीया, औरंगपुरा, महात्मा फुले चौक, खडकेश्वर महादेव मंदिर, मिलकॉर्नर मार्ग पोलीस आयुक्त कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चात अंदाजे ५०० ते ६०० ठेवीदार महिला व पुरुष सहभागी होण्याचा अंदाज आहे.

पोलिसांनी या अटी व शर्तींवर दिली परवानगी- १. सदर मोर्चामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची जाहीरात करु नये अथवा इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे गीत, वक्तव्ये, भाषण, घोषणा देवू नये.

२. सदर मोर्चा रस्त्याच्या डाव्या बाजूने काढण्यात यावा. मोर्चामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

३. सदर मोर्चामध्ये कोणत्याही पाळीव प्राण्यांचा समावेश करू नये.

४. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात कलम ३७(२) (३) म.पो.का प्रमाणे जमावबंदी आदेश लागू असल्याने सदर आदेशाचे पालन करावे.

५. सदर मोर्चामध्ये कोणतीही बेकायदेशीर कृती करून वैमनस्य निर्माण होवून शांतता भंग होईल असे कृत्य करु नये.

६. सदर मोर्चा मधील लोकांना सूचना देण्यासाठी वाहनांवर लावलेल्या ध्वनीक्षेपनाद्वारे आक्षेपार्ह वक्तव्य करु नये. ध्वनी प्रदुषण अधिनियमांचे पालन करावे व ध्वनीचा आवाज मर्यादित ठेवावा. कर्कश्य आवाजात ध्वनी प्रक्षेपण करू नये.

७. सदर मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून कोणत्याही शासकीय अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून देण्याची जबाबदारी नेतृत्व व संयोजकांवर राहील

८. सदर मोर्चा दरम्यान कोणत्याही प्रकारे वेश, जाती, जात, भाषा, वर्ण, प्रदेश जन्मस्थान, धर्म, इ. किंवा ते पाळत असणा-या प्रथा परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही. अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य, घोषणाबाजी कोणी करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

९. सदर मोर्चा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अँब्युलन्स, दवाखाना, शाळा, मेडीकल यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

२०. सदर मोर्चामध्ये आपले तर्फे आवश्यक से स्वयंसेवक नेमावेत. व महीलांची छेडखानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

११. सदर मोर्चावेळी रस्त्यावर कचरा अथवा घाण होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणाची जपवणुक करावी.

१२. सदर मोर्चा मध्ये मद्यार्क सेवन केलेली व्यक्ती सहभागी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

१३. सदर मोर्चा दरम्यान संशयित व अक्षेपाहार्य वस्तु बेवारस वाहन आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहीती दयावी.

१४. वरिल अटी व शीचे उल्लंघन केल्यास म.पो. का. कलम १३४ / १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

१५. बंदोबस्तावर नेमलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सूचनांचे पालन करावे.

२६. पोलीसांनी दिलेल्या अटी व शतीचे संयोजक व आयोजकांनी काटेकोरपणे पालन करावे तसेच परवानगी रद्द करण्याचा अधिकार पोलीसांना राहिल, असे निर्देश शहर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी मोर्चेकरांना व संयोजकांना दिले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!