महाराष्ट्र
Trending

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी व लिपीक लाच घेताना चतुर्भुज ! महानगरपालिकेच्या कार्यालयात घेतले ५५ हजार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – शैक्षणिक न्यायाधिकरणाने स्थगिती देऊनही सेवेत घेण्यासाठी लाचेची मागणी करणार्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी व लिपीकाला ५५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयात लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.

सुनिता सुभाष धनगर (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक) व नितीन अनिल जोशी (कनिष्ठ लिपीक, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले असल्याने त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण, नाशिक येथे दाद मागीतल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदर संस्था त्यांना सेवेत दाखल करून घेत नसल्याने त्यांनी यातील आरोपी  सुनिता सुभाष धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करणेसाठी अर्ज केलेला होता.

याबाबत पत्र देणेकरीता सुनिता सुभाष धनगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदार यांचे कडे ५००००/- रु. लाचेची मागणी केली तसेच सदर पत्र तयार करणेसाठी आरोपी नितीन अनिल जोशी, कनिष्ठ लिपीक, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे ५०००/- रू लाचेची मागणी केली. दोघांनी एकूण ५५,०००/- लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान सुनिता सुभाष धनगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे ५००००/- रु. लाचेची मागणी केली तसेच सदर पत्र तयार करणेसाठी  नितीन अनिल जोशी, कनिष्ठ लिपीक, शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे ५०००/- रू लाचेची मागणी केली. सुनिता सुभाष धनगर यांनी ५००००/- रू व नितीन जोशी यांनी ५०००/- रू लाचेची रक्कम दि. ०२.०६.२०२३ रोजी शिक्षण विभाग, महानगरपालीका, नाशिक या कार्यालयात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!