महाराष्ट्र
Trending

वकील गुणरत्न सदावर्तेंना झटका, दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द ! महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचा मोठा निर्णय !!

मुंबई, दि. २८ – एसटी कर्मचारी आणि मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्तें यांना मोठा झटका बसला आहे. वकीलीच्या गणवेशात आंदोलन केल्यामुळे त्यांची दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे. वकील सुशील मंचरकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने हा निर्णय दिला.

वकील सुशील मंचेकर यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. तशी रितसर तक्रारच त्यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलकडे केली होती. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळल्याने त्यावेळीही सदावर्तेना धक्का बसला होता.

त्यामुळे वकील सुशील मंचेकर यांनी केलेल्या तक्रारीवर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलकडे हे प्रकरण सुरु झाले. आणि गुणरत्न सदावर्ते यांची वकीलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलने दिला.

महाराष्ट्रात गाजलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकीलांचा गणवेश आणि बॅंड घालून गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात आंदोलन केले होते. यासंदर्भात झालेल्या बैठकीतही वकीलांचा गणवेश परिधान करून ते सहभागी झाल्याचा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप करण्यात आला होता. गुणरत्न सदावर्ते यांच्या अनेक कृती या वकिलांच्या अचारसंहितेत बसत नसल्याचा आरोप वकील सुशील मंचेकर यांनी केला होता. यावर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे.

Back to top button
error: Content is protected !!