छत्रपती संभाजीनगर
Trending
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा सुरळीत सुरु !
छत्रपती संभाजीनगर, दि.28 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा मंगळवारपासून (दि.२८) सुरु झाल्या आहेत. चार जिल्हयातील २४६ केंद्रावर सदर परीक्षा होणार असून प्रथम वर्षांच्या १ लाख ११ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी सुरळीत करण्यात आली आहे. बी.ए., बी.कॉम, व बी.एस्सी प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरु होत झाल्या. बी.ए, बी.एस्सी व बी.कॉम या परापरागत अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा २१ मार्चपासून अगोदर सुरु आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe