छत्रपती संभाजीनगर
Trending

अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा, बनावट FD दाखवून ३६ जणांना विनातारण कर्ज वाटले ! चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरेंवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – सहकारी पतसंस्था व नागरी बॅंकांचे एकापाठोपाठ घोटाळे समोर येत असून आता अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. यात खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. सतर्क व जाबांज अधिकारी तथा अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी सुमारे एका महिन्यात या बॅंकेतील गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.

अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिली. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सहकारी संस्थेच्या कार्यालयातून छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण व अनुषंगीक कामकाजाचे नियंत्रण करण्यात येते. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देण्यात येतो. अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, या कार्यालयाच्या दिनांक 31/08/2023 अन्वये प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांना अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद” या बँकेचे प्रशासक म्हणून नेमले आहे. दिनांक 31/08/2023 रोजी काकडे यांनी बँकेचे मुख्य कार्यालय झांबड हाईटस, जाधवमंडी येथे बँकेचा प्रशासक पदभार स्वीकारलेला आहे. बँकेचे जाधवमंडी व उस्मानपुरा येथे बँक शाखा आहेत.

मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर यांच्याकडून सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिनांक 28/08/2023 च्या गोपनिय पत्राद्वारे अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद या बँकेतील गंभीर अनियमितता बाबत कायद्यानुसार कारवाई करणेबाबत कळवले आहे. त्या अनुषंगाने उपनिबंधक (नागरी बँका, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र दिनांक 06/09/2023 अन्वये वरिल रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाच्या गोपनीय पत्राव्दारे कळविल्या प्रमाणे सदर प्रकरणाचे गांर्भिय लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेचे संदर्भीय आदेशानुसार / मागणी पत्रानुसार तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

खोट्या व बनावट मुदतठेव दाखवून 36 कर्जदारांना सुमारे 64.60 कोटी रुपये वाटले – भारतीय रिझर्व्ह बँकेचे दिनांक 28/08/2023 रोजीच्या पत्रानुसार अंजठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद या बँकेच्या लेखापरिक्षीत आर्थिक स्थितीत मुल्यांकन केलेल्या नेटवर्थ ( स्वनिधी) आणि सी. आर. ए. आर. (भारीत मालमत्ता प्रमाण) मध्ये खुप मोठा फरक आहे. नेटवर्थ रुपये (-) 70.14 कोटी आणि सी. आर. ए.आर मध्ये रुपये (-) 38.30 कोटी एवढे आहे. तसेच 36 कर्जदारांचे नावे सुमारे 64.60 कोटी रुपये खोट्या व बनावट मुदतठेव दाखवून सदर मुदत ठेव तारण दाखवून 36 कर्जधारकांना असुरक्षित कर्ज दिले. सदर बाब ही बँकेने दिनांक 23/12/2022 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेला दिलेल्या पत्रामध्ये मान्य केली आहे.

32.81 कोटी रुपये रक्कम ही भारतीय स्टेट बँक, ऍक्सीस बँक आणि MSC या बँकांमध्ये खोटे व बनावट बँक बाकी प्रमाणपत्र- याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेकडुन मिळालेल्या पत्रानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबादचे माजी कर्मचाऱ्याने दिनांक 17/04/2023 रोजी केलेल्या तक्रारीनुसार बँकेने दिनांक 31/03/2023 रोजी सुमारे 32.81 कोटी रुपये रक्कम ही भारतीय स्टेट बँक, ऍक्सीस बँक आणि MSC बँक औरंगाबाद या बँकांमध्ये खोटे व बनावट बँक बाकी प्रमाणपत्र हे बँकेचे लेखापरिक्षण करणारे वैधानिक लेखापरिक्षक यांच्याकडे सादर केले आहे.

अजिंठा अर्बन को. ऑप. बँक लि. औरंगाबादचे चेअरमन सुभाष मानकचंद झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, दिनांक 01/03/2006 ते 30/08/2023 या कालावधीतील बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केले.

या ३६ कर्जदारांना विनातारण कर्ज वाटप केले- कर्जदार नामे 1) जैन सुभाष, 2) बाचकर राजू, 3) सुराणा घेवरचंद 4) पाटणी विनोद, 5) जोशी पदमाकर 6) दमाले पाटील, 7) पवार एस.एस., 8) गायकवाड उत्तम डी., 9) सुराणा हेमलता, 10 ) गुजर राहुल, 11) कुलकर्णी रंगनाथ, 12) बोरा रेश्मा संदिप, 13) फळेगावकर प्रशांत, 14) दांगोडे गणेश ए., 15) पारख डी. एफ. 16 ) गोरे रुस्तुम, 17) संतोष सकाहारे, 18) सी. टी. सक्सेना, 19) नौसिन सबा, 20) पाटील संतोष, 21 ) पाटील जगन्नाथ, 22 ) गोरे माजी आर., 23 ) जैस्वाल सुनंदा, 24) पोपट बी. साखरे, 25) जसोरिया महेश 26) जैन परेश, 27) खंडेलवाल महेश,  28) ढोका वंश, 29 ) जैन सुरेंद्र, 30) टकले रमेश, 31 ) पाटील डी. आर. 32 ) जैन एस. एस., 33) अग्रवाल साधना एस. 34 ) अग्रवाल सुभाष एच.35 ) जाधव रमेश आणि 36 ) मिश्रा बिमल यांना विनातारण कर्ज वाटप केले आहे.

सनदी लेखापाल सतिष मोहरे यांनी त्यांच्या अहवालात बनावट व खोट्या नोंदी दाखवल्याच नाही- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबादचे सन 2022-23 या वर्षाचे लेखापरिक्षण करणारे सनदी लेखापाल सतिष मोहरे यांनी त्यांचे लेखा परिक्षण अहवालामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सन 2021-22 ची तपासणी झाल्याचे अहवालाबाबत नमुद केले आहे. परंतु त्यातील 36 मुदतठेवी बनावट व खोट्या नोंदीद्वारे दाखवले असल्याचे नमुद केले नाही. तसेच वैधानिक लेखापरिक्षण अहवालात दिनांक 31 मार्च 2023 वर बँक बाकी व ताळमेळ तपासल्याचे नमुद केले आहेत. परंतु SBI, Axis Bank आणि MSC Bank या बँकांमध्ये असलेल्या रूपये 32.81 कोटी रुपये रक्कमेचा फरकाचा ताळमेळ न घेता बँक बाकी प्रमाणपत्रा प्रमाणे खोटे व बनावट असल्याचे अभिप्राय नमुद केले नाही व झालेला अपहार उघड केला नाही.

बँकेच्या लेजर बुक मध्ये खोटी व बनावट नोंद – अजंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून दिनांक 01/03/2006 ते दिनांक 30/08/2023 या कालावधीमध्ये 64.60 कोटी रुपयाची मुदतठेव रक्कम बँकेच्या लेजर बुक मध्ये खोटी व बनावट नोंद दाखवली. तसेच दिनांक 31/03/2023 वर रुपये 32.81 कोटी बँकेची रक्कम ही एस.बी.आय बँक, ऍक्सीस बँक आणि एम.एस.सी बँक औरंगाबाद या बँकांच्या खात्यात जमा असल्याचे बनावट व खोटे प्रमाणपत्र तयार करून तसेच खोटा हिशोब दाखवून ताळेबंद तयार केला आहे.

अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदिप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतिष मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिली. तसेच खोटे व बनावट नोंदी घेवून खोटा हिशोब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!