छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

अजिंठा गावातील आठवडी बाजारात दोन गटांत तुंबळ हाणामारी ! महिला व युवतींचा पाठलाग करण्यावरून वाद पेटला, युवकांवर गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- आठवडी बाजारात हुल्लडबाजी करून, गोंधळ घालणा-या युवकांविरूध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहन अजिंठा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिनांक 13/8/23, रविवारी अजिंठा गावातील आठवडा बाजारात बाळापूर येथील दोन टवाळखोर युवकांनी बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिला, युवती, यांचा पाठलाग करत असल्याबाबत अजिंठा गावातील काही स्थानिक युवकांना संशय आला. त्यांनी संशयावरून बाहेरून आलेल्या त्या दोन मुलांची चौकशी करत असताना त्यांच्यात बाचाबाची होवून दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी सुरू झाली होती. यामुळे अजिंठा येथील गांधी चौक परिसरात गोंधळ निर्माण होवून हे तरून आपसात भिडल्याने बघणा-यांचा मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता.

याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात माहिती मिळताच स.पो.नि. प्रमोद भिंगारे यांनी घटनास्थळी धाव घेवून भरचौकात सार्वजनिक ठिकाणी गोधंळ घालून भांडण करणा-या तरूणांना लागलीच ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाणे अजिंठा येथे आणले. त्यांची कसून चौकशी करता त्यांच्यात संशयाचे कारणावरून आपसांत बाचाबाचीमुळे भांडण होवून मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालणे व हाणामारी करणे याबाबत भादंवी कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तरूणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात आली असून पोलसांची सर्व परिस्थीतीवर नियंत्रण असून अजिंठा गावात शांतता आहे.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जुने विवादीत बाबीचा काही असामाजिक तत्व हे फायदा घेवून सोशल मीडियाच्या माध्यमांतून निराधार व खोटी अफवा पसरवून जाती- जातीत तसेच दोन धर्मांत तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालुन निष्पाप तरूणाईचे डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतून दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये किंवा फॉरवर्ड करू नये,  तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा. घायीने प्रतिउत्तर देतांना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे. कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर व दृष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे (Visible Representation) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान  करणा-या व्यक्तीला  नमुद कलमा नुसार 3 वर्षा पर्यंत कारावास व दंड शिक्षा होवु शकते.

दरम्यान, ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, दिनेशकुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद भिंगारे, सपोनि अजिंठा यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!