छत्रपती संभाजीनगर
Trending

खतरनाक पाठलाग: पोलिसांच्या अंगावर टेम्पो घातला, पोलिसांनी टेम्पोच्या टायरवर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या ! एक जण पळाला, हर्सूल व आडगाव माहुलीच्या दोघांना बेड्या ठोकल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- संशयित टेम्पोला थांबण्याचा इशारा करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने सदर टेम्पोचा पाठलाग करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी दोन गोळ्या टेम्पोच्या टायरवर झाडल्या. हे पाहून चालकाने टेम्पो थांबवला व त्या टेम्पोतील तिघे जण पळू लागले. यातील दोघांना पोलिसांनी झडप घालून पकडले एक जण पळून गेला. झाल्टा फाटा येथून सुरु झालेला हा पाठशिवणीचा खेळ टाकळी गावाकडे जाणा-या पुलाजवळ थांबला. या घटनेत पोलिस अंमलदार जखमी झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे अंगावर टेम्पो घालून पळणार्या आरोपींना पोलिसांनी अशा रितीने पाठलाग करुन शिताफीने जेरबंद केले.

गौसखा अब्दुलखाँ पठाण (वय ५० वर्षे रा. आडगाव माहुली ता.जि. छत्रपती संभाजीनगर), शेख सलमान शेख कैसर (वय २० वर्षे रा. हर्सूल ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक जण हा जळगाव रोडने त्याचे ताब्यातील टेम्पोची नंबर प्लेट वाकवून भरधाव काहीतरी संशयित साहित्य घेवून जात आहे. ही खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक सतीष वाघ स्थागुशा यांनी स्थागुशा येथे हजर असलेल्या स्टाफचे दोन पथके तयार केली. त्यांना खाजगी वाहनाने मिळालेल्या माहितीची खात्री करणे व वाहनाचा शोध घेण्यासाठी रवाना केले.

पथक हे झाल्टा फाटा येथे थांबून असताना मिळालेल्या माहितीप्रमाणे टेम्पो येत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी सदर टेम्पोस थांबण्याचा इशारा केला. सदर वाहन चालकाने पोलिसांच्या इशा- याकडे दुर्लक्ष करून वाहन न थांबविता पोलिसांचे दिशेने गती वाढवून पोलीस पथकातील एका पोलीस अंमलदाराच्या अंगावर वाहन चालवून जिवे मारण्याचे उद्देशाने धडक देवून गंभीर जखमी केले. त्यांनंतर पुन्हा सदर चालकाने वाहन जोरात पळवण्यास सुरवात केली. पथकाने त्यांचा पाठलाग सुरु केला. सदर वाहन चालक पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करु देत नव्हता व पाठलाग करीत असलेल्या पोलिसांच्या वाहनास धडक देण्याच प्रयत्न करीत होता.

पोलिस पथकाने त्यांचा पठलाग सुरुच ठेवला. सदर चालकाने वाहन हे निपानी गावामध्ये टाकले. जालना रोडने जात असल्याचे पोलीसांना हे लक्षात आल्याने पोलीसांनी तात्काळ त्यांचे वहन हे दुस-या दिशेने नेवून टाकळी गावाकडे जाणा-या पुलाखाली थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर चालकाने वाहन पुन्हा पोलीसांचे आंगावर टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांना त्यांचेकडील शासकीय रिवाल्वरने दोन राउंड टेम्पोच्या टायरच्या दिशेने फायर केले. फायरचा आवाज ऐकून टेम्पोचालकाने टेम्पो जागेवर थांबवून त्यातून तीन जण पळून जाऊ लागल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांतील दोघांना ताब्यात घेतले.

त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नावे १) गौसखा अब्दुलखाँ पठाण (वय ५० वर्षे रा. आडगाव माहुली ता.जि. छत्रपती संभाजीनगर), २) शेख सलमान शेख कैसर (वय २० वर्षे रा. हर्सूल ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सांगीतले. त्यांचा एक साथीदार पळुन गेला असून मिळालेल्या संशयितांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सदर टेम्पो हा सिल्लोड शहरातील आर. एल. पार्कच्या मोकळ्या जागेवरुन दि. ११/०८/२०२३ रोजी मध्यरात्री नंतर चोरी केलेला असल्याचे सांगितले.

याबाबत पोस्टे सिल्लोड शहर येथे गुरन १६० / २०२३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर टाटा कंपनीचे टेम्पो क्र.एच.एम. २० डी.इ.६२२३ ज्याची किमत १,५०,०००/- रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोस्टे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चिकलठाणा पोलीस करीत आहे.

ही कामगीरी पोलीस अधिक्षक मनीष कलवानीया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाघ पोलीस निरीक्षक स्थागुशा रविंद्र खांडेकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिकलठाणा पोउपनि मधुकर मोरे, पोह/ संतोष पाटीस, संजय घुगे, सचिन ढवळे पोना / गणेश सोनवणे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!