महाराष्ट्र
Trending

अंबडच्या मुकादमाने नोटरी करूनही ऊसतोडीला टोळी पाठवली नाही ! साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- नोटरी करार करूनही ऊसतोडीसाठी कामगारांची टोळी न पाठवल्याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुकादम ताहेर सखरखा पठाण (रा. दुनगाव ता. अंबड जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

भास्कर शामराव वाघमोडे (वय 35 वर्षे धंदा शेती रा. चिकुर्डे ता. वाळवा जि. सांगली) याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, 2020 साली ट्रक्टर घेतला असून तो ऊस वाहतुकीसाठी चालवतात. भास्कर शामराव वाघमोडे हे चिकुर्डे गावातून बांबवडे किंवा वारणा कारखाना येथे ऊस वाहतूक करीत असतात. ट्रक्टरच्या वाहतुकीसाठी भास्कर शामराव वाघमोडे यांनी ऊसतोड कामगार मुकादम ताहेर सखरखा पठाण (रा. दुनगाव ता. अंबड जि. जालना) यांच्यासोबत बोलणी करून त्यांच्याकडील 12 कोयते म्हणजे 24 कामगार आणून सन 2021-2022 चे गळीत हंगामासाठी येवून काम करण्याचा दि. 16/11/2021 रोजी नोटरी करार (अंबड जि. जालना) साक्षिदारांसमक्ष केला आहे.

सदर कराराप्रमाणे मुकादम यास त्याच्या गावी जावून रोख रक्कम 350000/- रूपये दिले आहेत. भास्कर शामराव वाघमोडे यांनी त्यास रोख पैसे दिले. भास्कर शामराव वाघमोडे यांनी ऊसतोड कामगार मुकादम ताहेर सखरखा पठाण (रा. दुनगाव ता. अंबड जि. जालना) यास ऊसतोड व भरणी साठी कामगार पुरविण्यासाठी बोलणी करून नोटरी करार करून त्याप्रमाणे त्यास रोख रक्कम 350000/- रुपये दिले. मात्र, त्याने ऊसतोड व भरणी करीता कामगारासह 2021-2022 मध्ये गळीत हंगाम चालू झाला असताना येणे आवश्यक होते.

परंतू तो येत नसल्याने भास्कर शामराव वाघमोडे यांनी त्यास फोनवर संपर्क केला. मात्र, कामगार घेवून येणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. त्यास भास्कर शामराव वाघमोडे याने वारंवार संपर्क केला. त्यांनी ठरल्या कराराप्रमाणे तसेच पैसे घेतल्याप्रमाणे कामगार घेवून न येता तसेच पैसे परत न करता ऊसतोड कामगार मुकादम ताहेर सखरखा पठाण (रा. दुनगाव ता. अंबड जि. जालना) यांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भास्कर शामराव वाघमोडे  याने दिलेल्या तक्रारीवरून मुकादम ताहेर सखरखा पठाण (रा. दुनगाव ता. अंबड जि. जालना) यांच्यावर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!