महाराष्ट्र
Trending

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास मारहाण, अंबाजोगाईत रस्त्याचे काम बंद पाडले, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- दलीत वस्ती या योजने अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याच्या काम बंद पाडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली. याप्रकरणी सदर कनिष्ठ अभियंत्याने पोलिस स्टेशन गाठून रितसर फिर्याद दिली.

गोविंद भगवानराव शेळके (वय 45 वर्षे, व्यवसाय नौकरी, कनिष्ठ अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग अंबाजोगाई, रा. लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई जि.बीड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 26/11/2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत दलीत वस्ती या योजने अंतर्गत सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालय अंबाजोगाई ते दवाखाना रोड अंबाजोगाई या रस्त्याचे काम चालू आहे.

या रस्त्याचे काम हे यश कंन्स्ट्रशन यांना देण्यात आलेले आहे. या रस्त्याच्या कामावर कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके व त्यांचे सहकारी सुपरवायझर, मशीन ऑपरेटर हजर होते. सदरचे कामकाज करीत असताना नदीम काझी (रा. पेन्शनपुरा अंबाजोगाई) यांनी दुपारी 01:00 पासून 02:50 वाजेपर्यंत काम बंद करीत कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली. शासकिय कामात अडथळा आणला. काझी यांनी मशीनवरही दगडफेक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नदीम काझी (रा. पेन्शनपुरा अंबाजोगाई) यांच्यावर अंबाजोगाई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!