महाराष्ट्रराजकारण
Trending

बीडच्या जाळपोळीवर रोहित पवारांची धक्कादायक माहिती, म्हणाले बीडमध्ये जे घडलं तो कदाचीत फक्त ट्रेलर असू शकतो ! जानेवारीत खूप मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं लोकांनी बोलून दाखवलं !!

प आपल्या गावामध्ये आपआपल्या शहरांमध्ये शांतता कशी राहील यासाठी तुम्हा सर्वांना प्रयत्न करा

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – बीडमध्ये जे घडलं तो कदाचीत फक्त ट्रेलर असू शकतो. जानेवारी महिन्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात करून जावू शकतं. पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आप आपल्या गावामध्ये आपआपल्या शहरांमध्ये शांतता कशी राहील यासाठी तुम्हा सर्वांना प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले.

युवा संघर्ष यात्रेदरम्यान जिंतूर येथे आयोजित सभेत रोहित पवार बोलत होते. रोहित पवार म्हणाले की, आज सुद्धा काही लोकांनी बोलून दाखवलं. बीडमधल्या लोकांनी बोलून दाखवलं. जे बीडमध्ये घडलं तो कदाचीत फक्त ट्रेलर असू शकतो. जानेवारी महिन्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात करून जावू शकतं. पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आप आपल्या गावामध्ये आपआपल्या शहरांमध्ये शांतता कशी राहील यासाठी तुम्हा सर्वांना प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहनही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केले.

आपण सर्वजण नेते जेव्हा येतात आणि सत्तेतले नेते जेंव्हा येतात त्यांना एवढंच बोलायचं की मुद्द्याचं बोला. आमच्या अडचणीवर बोला. उगाच फापट पसारा बोलू नका. आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या सोडवणार आहेत की नाही ? याच्यावर तुम्ही बोला. एवढंच या सर्व नेत्यांना आपण बोललं पाहिजे.  जिंतूरमध्ये येवून तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. विजयरावांनी खूप चांगलं असं नियोजन याठिकाणी केलं, असंही रोहीत पवार म्हणाले.

दरम्यान, जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथे युवा संघर्ष यात्रेदरम्यान काल मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सरकारने तात्काळ स्वरूपात याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्याच्या विविध भागात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंतीही रोहित पवार यांनी सरकारकडे केली.

Back to top button
error: Content is protected !!