वैजापूर
Trending

अंगणवाडी सेविकांनी जीवाची पर्वा न करता खेड्या-पाड्यात आरोग्य सेवा दिली ! प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून केला गौरव !!

आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनी केला कौतुकाचा वर्षाव

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – संपूर्ण जगाला डोकेदुखी ठरलेल्या कोविड १९ काळात खेड्या-पाड्यात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी जीवाची पर्वा न करता ग्रामस्थांना आरोग्य सेवा देऊन प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याचे गौरवोद्गार आमदार प्रा.रमेश बोरनारे काढले. एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प विभागाकडून वैजापूर पंचायत समिती सभागृहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमात आ. बोरनारे यांनी अंगणवाडी सेविकांवर कौतुकाचा वर्षाव केला.

सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या निवड समितीने गावाच्या ठिकाणी उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या महिलांची पुरस्कारासाठी निवड केली. या पुरस्काराचे स्वरुप प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह आणि पाचशे रुपये रोख असे होते. या कार्यक्रमास सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सांळुके, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळे, गोरख आहेर, गटविकास अधिकारी एच. आर. बोयनर, सहाय्यक गटविकास अधिकारी अमेय पवार, एकात्मिक बालविकास विभागाचे संतोष जाधव, विधी अधिकारी सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी सरपंच हरिभाऊ सांळुके, चंद्रकांत पवार, सुदाम आहेर, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कसबे, अरुण होले, हरिभाऊ साळुंके, राजूभाऊ छानवाल, सुभाष कदम, वसंत त्रिभुवन, सुदाम गोरे, विठ्ठल पगार, संदीप बोर्डे, अरविंद शेवाळे, चंद्रकांत पवार, दौलत गायकवाड, , राजेंद्र काटे, दादाभाऊ गुंजाळ, नितीन साळुंके, संभाजी पा शिंदे, मल्हारी पठाडे, राजेंद्र चव्हाण, अनिल कुळधर, नवनाथ पवार, नरेंद्र सरोवर, शंकर कदम, राधू अण्णा सरोवर, डॉ गणेश चव्हाण, रामनाथ तांबे, राजेंद्र बावंचे, हरी ठोंबरे, विजय चोभे, दिलीप भांडे, दत्तू भाऊ खिल्लारे, संतोष बंगाळ, बाळासाहेब कदम, वाल्मीक वाळके, वाल्मीक बावचे आदी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!