महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये रूजू ! अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणार !!

नांदेड दि.१४ डिसेंबर२०२२: महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार अनिल डोये यांनी मंगळवारी (दि.१३) स्वीकारला.

मुख्य अभियंता अनिल डोये यापुर्वी अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी कार्यरत होते. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९५ साली सहाय्यक अभियंता म्हणून पालघर उपविभाग येथे काम केलेले डोये यांनी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता ते मुख्य अभियंता पदी राज्यातील विविध प्रादेशिक विभागामधे काम केलेले आहे.

सांघिक कार्यालय, भांडूप, कल्याण, अकोला अशा ठिकाणी त्यांनी यशश्वी सेवा दिलेली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही त्यांनी उत्तमपणे काम केलेले आहे. कडक शिस्तीचे असलेल्या डोये यांना  प्रदिर्घ अनुभव आहे. एक अभ्यासू व कुशल  प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे.

ग्राहकसेवेला प्राधान्य देत महावितरणची आर्थिक परिस्थिती भक्कम करण्याच्या दृष्टीने चालू वीजबिलांसह थकबाकी वसुल करणे, कृषीपंपाच्या प्रलंबीत वीजजोडण्या प्राधान्याने देणे, वीजगळती कमी करण्याबरोबरच परिमंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याचा मनोदय डोये यांनी पदभार घेताना व्यक्त केला.

Back to top button
error: Content is protected !!