महाराष्ट्र
Trending

जालन्यातील एचडीएफसी बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याचा खून करून मृतदेह मंठा मार्केट यार्ड परिसरात फेकला ! उंबरखेड ते जालना करायचा अपडाऊन !!

जालना, दि. ८ – अराईज बीपीओ कंपनी मार्फत वसुली अधिकारी म्हणून एचडीएफसी बँक जालना येथे कार्यरत वसुली अधिकार्याचा खून करून त्याचा मृतदेह मंठा येथील मार्कट यार्ड परिसरात फेकून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्याराने डोक्यात, हातावर, पायावर, पाठीवर जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आला.

प्रदीप भाऊराव कायंदे (रा. उंबरखेड ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. प्रदीपचा मतदेह विश्वनाथ संपतराव बोराडे (रा. मार्केड यार्ड मंठा, जि. जालना) यांच्या घरासमोर आढळून आला.

सतीश भाऊराव कायंदे (वय 37 वर्षे व्यवसाय शेती चालक रा. उंबरखेड ता. देऊळगावराजा जि. बुलढाणा) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सध्या गावी उंबरखेड येथे घराचे काम चालु असल्यामुळे तात्पुरता देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथे राहतो. सतीश भाऊराव कायंदे यांचा भाऊ प्रदीप कायंदे हा अराईज बीपीओ कंपनी मार्फत वसुली अधिकारी म्हणून एचडीएफसी बँक जालना येथे काम करत होता व त्याच्याकडे वसुली करण्याठी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) हा परिसर होता. तो दररोज मोटारसायकलवर उंबरखेड ते जालना येणे जाणे करीत होता.

दिनांक 07/04/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता नेहमीप्रमाणे सतीश भाऊराव कायंदे यांचा भाऊ प्रदीप कायंदे ड्युटीवर जालना येथे निघून गेला होता. सतीश भाऊराव कायंदे यांनी भाड्याने पीकअप घेवून देऊळगाव राजा येथे गेले होते. संध्याकाळी 06.00 वाजता देऊळगाव राजा येथून सतीश भाऊराव कायंदे यांनी भाऊ प्रदीप यास कॉल केला की, आपल्या घरी मिस्तरी आले आहेत, फिंटीगचे काम चालु आहे. तू तेथे जा असे सांगितले असता भाऊ प्रदीप म्हणाला होता की, मी सध्या जालना येथे आहे मला येण्यासाठी थोडा उशीर होईल असे म्हणाला होता. परंतु तो रात्री घरी आला नाही.

त्यानंतर आज दिनांक 08/04/2023 रोजी सतीश भाऊराव कायंदे हे पीकअप वाहनात भाजीपाला घेवून जालना येथे विक्री करण्यासाठी गेले असता त्यांना सकाळी 08.00 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीचा फोन आला व त्या म्हणाल्या की, दादाचा (भाऊ प्रदीप) अपघात झाला आहे. तुम्ही त्यांना फोन करा. त्यावरुन सतीश भाऊराव कायंदे यांनी भाऊ प्रदीप यास त्याच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता त्यावेळी पोलिसांनी सांगीतले की, प्रदीप भाऊराव कायंदे हा मंठा येथे मार्केड यार्ड परिसरात मृत अवस्थेत पडलेला आहे. तुम्ही लवकर मंठा येथे या असे सांगितले.

त्यानुसार सतीश भाऊराव कायंदे हे जालना येथून मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असता पोस्ट मार्टम रुममध्ये सतीश भाऊराव कायंदे यांचा भाऊ प्रदीप मृत अवस्थेत दिसून आला. त्याच्या मृतदेहाकडे बारकाईने पाहिले असता त्याच्या अंगावर मारहाणीच्या मोठ्‌या प्रमाणात जखमा दिसून आल्या. त्याच्या पायातून रक्त येत होते तसेच पायावर पाठीवर मारल्याच्या काळ्या निळ्या जखमा निदर्शनास आल्या. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून डॉक्टरांनी पोस्ट मार्टम केले असता त्यामध्ये प्रदीपच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा होवून तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रदीप कायंदे हा विश्वनाथ संपतराव बोराडे (रा. मार्केड यार्ड मंठा, जि. जालना) यांच्या घरासमोर मृत अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, सुरुवातीला पोलिस ठाणे मंठा येथे आकस्मात मृत्यूची खबर प्राप्त झाली होती. त्यानंतर मृत प्रदीपचा भाऊ सतीश भाऊराव कायंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खूनाच गुन्हा दाखल करण्यात आला असून मंठा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!