कन्नडछत्रपती संभाजीनगर
Trending

पिशोर पोलिस स्टेशनच्या API कोमल शिंदेंसह अन्य पोलिसांची चौकशी करण्याचे खा. इम्तियाज जलील यांना आश्वासन, कन्नडचा मोर्चा तुर्तास स्थगित !!

शेलगाव प्रकरणात चौकशी करून दोषी पोलिसांविरोधात करणार कारवाई; विशेष पोलीस महानिरिक्षकांनी खासदार जलील यांना दिले आश्वासन

Story Highlights
  • वरिष्ठांना चुकीची माहिती देवून दिशाभुल केल्याने पोलीस अधीक्षक व अतिरीक्त पोलिस अधीक्षक सुध्दा करणार कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ : शेलगाव गावात ३८ वर्षीय महिला शबाना पटेल यांना रात्रीच्या वेळी घरात घुसुन अमानुषपणे मारहाण करणारे एपीआय कोमल शिंदे व इतर चार पोलीस कर्मचार्‍यांविरोधात सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन विशेष पोलीस महानिरिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया व अति.पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिले.

संबंधित पोलीसांविरोधात कायदेशिर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मंगळवार रोजी छत्रपती संभाजीनगर ते कन्नडपर्यंत पोलिस अत्याचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चास तुर्तास स्थगिती देत असून विहीत मुदतीत सखोल चौकशी करून दोषी पोलिसांविरोधात कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत झालेल्या चर्चे दरम्यान विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधीक्षक व अति. अधीक्षक यांनी सांगितले की, संबंधित स्थानिक पोलिसांनी चुकीची माहिती देवून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची दिशाभुल केली. तसेच घडलेल्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती लपविली असल्याचे म्हटले.

यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध करत पीडितेचे फोटो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांना पाठवले आहेत. सदर महिलेला रात्रीच्या वेळी घरात घुसुन पुरुष पोलिस बेदम मारहाण करतात हे कृत्य निषेधार्थ व बेकायदेशीर असून त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणीही केली होती.

Back to top button
error: Content is protected !!