संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – जालन्याच्या राजुरी स्टिल कंपनीत रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न फसला. वॉचमननी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दोन चोरटे रंगेहात चोरी करताना पकडले.
नंदु अशोक भाणुसे (वय 22 वर्ष रा. शिवनगर जुना जालना), अक्षय दत्तु कोरडे (वय 26 वर्षे रा. शास्त्री मोह्हला जुना जालना) अशी आरोपींची नावे आहेत. नंदकिशोर पंडितराव कुरधणे (वय 30 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. भाग्यनगर जुना जालना) हे राजुरी स्टील कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणुन काम पाहतात.
सुपरवायझर नंदकिशोर पंडितराव कुरधणे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 05/06/2023 रोजी रात्री 12:45 वाजेच्या सुमारास ते घरी असताना त्यांना गेटइंचार्ज परमेश्वर तत्याराव लहामगे यांनी फोन करून कळवले की, कंपनीमध्ये दोन चोरटे चोरी करताना मिळून आले. आम्ही त्यांना पकडुन ठेवले आहे. ते आम्हला मारहाण करीत आहे, असे गेटइंचार्ज परमेश्वर लहामगे यांनी कळवल्याने सुपरवायझर नंदकिशोर पंडितराव कुरधणे हे तातडीने राजुरी स्टील कंपनीमध्ये पोहोचले.
सुपरवायझर नंदकिशोर पंडितराव कुरधणे यांनी त्या दोन्ही चोरट्यांना विचरपुस केली असता त्यांनी त्याची नावे 1 ) नंदु अशोक भाणुसे वय 22 वर्ष रा. शिवनगर जुना जालना 2) अक्षय दत्तु कोरडे वय 26 वर्षे रा. शास्त्री मोह्हला जुना जालना असे सांगितले. त्यांनी कंपनीतून कॉपरचे दोन तुकडे अंदाजे वजन आठ ते दहा किलो व किमंत अंदाजे 15000/- अशी असून ते चोरुन घेवून जातांना वाँचमन पवार, लहामगे यांनी झटापट करून पकडले.
याप्रकरणी नंदकिशोर पंडितराव कुरधणे (वय 30 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. भाग्यनगर जुना जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये नंदु अशोक भाणुसे (वय 22 वर्ष रा. शिवनगर जुना जालना), अक्षय दत्तु कोरडे (वय 26 वर्षे रा. शास्त्री मोह्हला जुना जालना) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the छत्रपती संभाजीनगर Live channel on WhatsApp:👇
https://whatsapp.com/channel/0029Va9cQwH1HspwZDjxdY29 - पुढील मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट
9923355999