उस्मानपुरा क्लॉथ सेंटर: मुलीने गल्ल्यात हात टाकला दुकानदारास लक्षात येताच सोबतच्या दोन महिला पळून जात असताना पाठलाग करून पकडले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – मुलीने गल्ल्यात हात टाकताच दुकानदारास संशय आला. तेव्हा सोबतच्या दोन महिला पळून जात असताना दुकानदाराने त्यांचा पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
ही घटना दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४. ५५ वाजता राजेश क्लॉथ सेंटर सराफा मार्केट उस्मानपुरा येथे घडली. याप्रकरणी ३ महिलांवर उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहीत लालचंद विजयवर्गीय त्यांच्या छोट्या मुलास राजेश क्लॉथ सेंटर दुकानात थांबवून ते जेवणासाठी घरी गेले. त्यांचा मोठा मुलगा वंश हा फिर्यादीस म्हणाला की, मला बँडमिंटन क्लासला सोडा तेव्हा ते त्यांच्या कापड दुकाना समोर आले. त्यावेळी दोन, तीन महीला दुकानातील लहान मुलगा अंश यास धक्काबुक्की करीत असल्याचे फिर्यादी रोहीत लालचंद विजयवर्गीय यांना दिसून आले.
तेव्हा फिर्यादी रोहीत लालचंद विजयवर्गीय यांना त्या महिलांचा संशय आला. त्याचवेळी फिर्यादी रोहीत लालचंद विजयवर्गीय यांनी गल्ल्याकडे नजर टाकली असता त्यांना एक लहान मुलगी गल्ल्यातून पैसे चोरण्याचा प्रयत्न करीत होती. त्याचवेळी सोबतच्या महीला पळून गेल्या. तेव्हा फिर्यादी रोहीत लालचंद विजयवर्गीय यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवून पोलीसांच्या ताब्यात दिले.
रोहीत लालचंद विजयवर्गीय (वय 45 वर्षे धंदा- कापड दुकान रा. कोस्टामँपल अपार्टमेंट, प्लॅट नं. 101. इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर, उस्माणपुरा) यांच्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ३ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PSI गौरे करीत आहेत
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe