छत्रपती संभाजीनगर
Trending

चेलीपुऱ्यात चाकुहल्ला: क्यो रे तू बहोत मस्तीमें आया है, तुझे झडाना पडेगा ! शाहरुख हम इसको निपटा डालते है, ये बहोत डॉन बन रहा है !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – चेलीपुरा चौकात ट्रॅफीक असल्याने गाडीची स्पिड कमी झाली तेव्हा त्या ठिकाणी आरोपी गाडीजवळ आला आणि मोपेडची चावी काढून घेतली. त्यानंतर रागाने पाहात “क्यो रे तू बहोत मस्तीमें आया है, तुझे झडाना पडेगा, ” असे धमकावले. त्यानंतर त्याचे दोन साथीदार आले आणि “शाहरुख हम इसको निपटा डालते है, ये बहोत डॉन बन रहा है असे धमकावले. प्रकरण पार चाकुहल्ल्यापर्यंत पोहोचले. यात एक जण जखमी झाला. ही घटना दुपारी ३.४५ वाजेदरम्यान चेलीपुरा चौक परिसरात घडली.

शेख शाहरुख शेख सलीम (वय.26 वर्षे, रा. रेंगटीपुरा, औरंगाबाद) व दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन हे नमाज पढून चेलीपुरा चौक येथे आले. तेथे ट्रॅफीक असल्याने सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांच्या गाडीची स्पिड कमी झाली होती. तेव्हा त्या ठिकाणी आरोपी शेख शाहरुख हा सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांच्या गाडीजवळ आला मोपेडची चावी काढून घेतली. सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांच्याकडे रागाने पाहात शाहरुख म्हणाला, “क्यो रे तू बहोत मस्तीमें आया है, तुझे झडाना पडेगा, ” असे धमकावले.

यामुळे सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन हे गोंधळून गेले व रस्त्याच्या बाजूला मोपेड घेवून शाहरुखला विचारले की, “मुझे ठीक से बोलो क्या हुआ है, तुम ऐसे क्यो बोल रहे हो.” शाहरुख हा रागात असल्याने व सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांच्या सोबत त्यांची लहान मुले असल्याने ते म्हणाले,” भाई तुम जरा शांत हो जाओ, मैं तुम्हे चाय पिलाता, जरा बाजू तो चलो, रास्ते में शोर मत करो.” असे म्हणून सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांनी त्यांच्या मुलांना गाडी जवळ थांबवून समोर असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये गेले.

त्याचवेळी शाहरुख यांनी चहाचा कप हातात घेवून फेकला व आजूबाजूला असलेल्या त्याच्या ओळखीच्या दुसऱ्या दोन साथीदारांना बोलवले. त्यापैकी एकजण म्हणाला की, “शाहरुख हम इसको निपटा डालते है, ये बहोत डाँन बन रहा है,” असे म्हणून शाहरुख व त्याचे दोन साथीदार यांनी सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांना मारहान करण्यास सुरुवात केली. ते तिघे शिवीगाळ करु लागले.

शाहरुख यांनी त्यांच्या शर्टामध्ये लपवलेला चाकू काढला व सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांच्यावर वार करु लागले. सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन यांनी बचावाचा प्रयत्न केला व चहाच्या हाँटेलमधील खुर्ची हातात धरुन चाकूचा घाव आडवण्याचा प्रयत्न केला परंतू चाकूचा वार डोक्याच्या मागील बाजूस व पाठीला लागला. यात सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन हे जखमी झाले.

सय्यद हसीब सय्यद खैसरोद्दीन (वय ३६, रा. एस टी कॉलनी फाजलपुरा, औरंगाबाद) यांनी रात्री ९.४० वाजता दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात शेख शाहरुख शेख सलीम (वय.26 वर्षे, रा. रेंगटीपुरा, औरंगाबाद) व दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पउपनि निवृत्ती गायके करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!