महाराष्ट्र
Trending

पेंशन अदालतीचे मुंबईत आयोजन; पदोन्नती, वेतनश्रेणी आणि धोरणात्मक प्रकरणांचा विचार केला जाणार !!

महाराष्ट्र टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत

 मुंबई, दिनांक16-03-2023 – मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत दिनांक16-03-2023 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.

पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांची प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तीन प्रति, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 15-02-2023 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुप ने (एकगठ्ठा/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकतात. 15-02-2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

भारतीय डाक विभाग

डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा फॉर्म

क्र.

 

विषयवैयक्तिक निवृत्तिवेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील
1.निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव 
2.कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख 
3पीपीओ क्रमांक 
4पोस्टऑफिसचे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे. 
5निवृत्तिवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता

दूरध्वनी सोबत.

 
6थोडक्यात तक्रार

(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)

 
7व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक 

 

Back to top button
error: Content is protected !!