छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

औरंगाबाद शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स काढण्याचे आदेश ! सुशोभीकरणाचे काम बुधवारपर्यंत पूर्ण करा !!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरींनी घेतला आढावा

संभाजीनगर लाईव्ह, दि. 20 फेब्रुवारी; G-20 परिषद निमित्त सुशोभीकरण आणि सौंदर्य करणाचे काम 22 फेब्रुवारीच्या आत पूर्ण करून घ्यावे असे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले.

G-20 निमित्त सुरू असलेले कामांच्या सखोल आढावा त्यांनी आज सकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित एका आढावा बैठकीत घेतला. आढावा घेत असताना त्यांनी काही सूचना देखील केल्या.

प्रशासकांनी यावेळी निर्देश दिले की G-20 निमित्त सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे काम कालमर्यादेत करत असताना संबंधित अभियंतांनी कामाची गुणवत्ता वर लक्ष द्यावे. घाईघाईत गुणवत्तावर दुर्लक्ष करणे चुकीचे होईल.

ते पुढे म्हणाले की, शहरातील सर्व वाहतूक बेट यांची किरकोळ दुरुस्ती व रंगोटी करण्यात यावी तसेच शहरातील लावण्यात आलेल्या अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स उद्यापासून मोहीम राबवून तात्काळ काढण्याची सुरुवात संबंधित विभागाने करावी. तसेच भंगार पडलेले वाहनेदेखील उचलण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

विशेषतः ज्या रस्त्यांवर G-20 परिषदेसाठी येणारे पाहुणे यांची ये-जा राहणार आहे त्या रस्त्यांवरचे सुशोभीकरणचे काम 22 फेब्रुवारी च्या आत संपूर्ण करून घ्यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय शहरातील स्कायवॉक (फूट ओव्हर ब्रिज) यांची रंगरंगोटी करून त्यांच्यावर रोषणाई करावी, असे निर्देश देखील त्यांनी या बैठकीत दिले.

सदरील बैठकीत प्रशासकांनी रस्त्यांवरचे सौंदर्यकरण व सुशोभीकरणचे काम, मकबरा परिसर स्वच्छ करणे, दुभाजक वाहतूक बेट आणि भिंतीचे सुशोभीकरण, हेरिटेज टूर इत्यादी कामांच्या वॉर्ड निहाय आढावा घेतला.

सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता एबी देशमुख, उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव,  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, उप आयुक्त राहुल सूर्यवंशी, स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, कार्यकारी अभियंता बि डी फड, डी के पंडित, राजू संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील तसेच सर्व वॉर्डांचे सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड अभियंता, पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!