महाराष्ट्र
Trending

अंबाजोगाईत बी एड प्रवेश परीक्षेत सावळा गोंधळ, एकाच विद्यार्थ्याला दोन वेगवेगळी परीक्षा केंद्र ! ‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घ्या !!

पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांकडे मागणी

Story Highlights
  • काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर दोन वेगवेगळ्या तारखा व वेगवेगळी परीक्षा केंद्र

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- बी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 एप्रिल रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तसे हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना मिळाले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आज ही परीक्षा देता आलेली नाही. त्यामुळे सदरील परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीईटी सेल’ने पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.26) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.

आ.सतीश चव्हाण यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता बी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नुकतीच प्रवेश परीक्षा घेतली. अनेक विद्यार्थ्यांना 26 एप्रिल रोजीचे हॉल तिकीट मिळाले.

सदरील प्रवेश परीक्षेत अंबाजोगाई (जि.बीड) येथील परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आज ही परीक्षा देता आलेली नाही. एकाच विद्यार्थ्याला दोन वेगवेगळी परीक्षा केंद्र देण्यात आली. तर काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर दोन वेगवेगळ्या तारखा व वेगवेगळी परीक्षा केंद्र देण्यात आली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

सदरील परीक्षा देण्यासाठी आज अंबाजोगाई परीक्षा केंद्रावर विद्यार्थी गेले असता त्यांना याठिकाणी तुमची परीक्षाच नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी परत संकेतस्थळावर हॉल तिकीट पाहिले असता काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बीड तर काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र लातूर येथे आले असल्याचे निदर्शनास आले. परीक्षेची वेळ सारखीच असल्याने विद्यार्थ्यांना वेळेअभावी त्याठिकाणी जाऊन परीक्षा देता आली नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता आज जे विद्यार्थी बी.एड. प्रवेश परीक्षा देऊ शकले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!