महाराष्ट्र
Trending

बदनापूरमध्ये वाटमारी, तीन नशेखोर युवकांचा दुचाकीस्वारावर धारदार शस्राने हल्ला ! पोलिसांच्या नाईट राऊंडच्या जीपला थोडा उशीर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – जालना बदनापूर- छत्रपती संभाजीनगर हायवे मार्गाने निघालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील खासजी नौकरदाराला बदनापूरमध्ये तीन नशेखोरांनी गाडी आडवून वाटमारी केली. दंडावर धारदार शस्राने हल्ला चढवून भीती दाखवून लुटले. ही घटना बदनापूर हायवे रोडवर आशा अर्धागवायु केंद्रा जवळ घडली. लूटमार करून तीन नशेखोर पसार झाले. त्यानंतर जखमी नौकरदार त्याची दुचाकी ढकलत जात असताना पोलिस आले व त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या नाईट राऊंडच्या जीपला थोडासा उशीर झाला नाहीतर ते तिघेही नशेखोर चोरटे गजाआड असते.

समाधान शेषराव खिल्लारे (वय 46 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा. भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी बदनापूर पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते खाजगी नौकरी करतात. खाजगी नौकरी निमित्ताने त्यांना रात्री ऊशीरा प्रवास करावा लागत असे. दि. 19/06/2023 रोजी समाधान शेषराव खिल्लारे हे कामा मिमित्ताने देऊळगावराजा (जि. बुलढाणा) येथे गेले होते व इशुरंन्सचे काम आटोपून 10.30 वाजेच्या सुमारस देऊळगावराजा येथून परत घराकडे जालना बदनापूर- छत्रपती संभाजीनगर हायवे मार्गाने होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकलवर ते निघाले.

रस्त्याने जात असतांना 12.00 वाजेच्या सुमारस बदनापूर येथील हायवे रोडवर आशा अर्धागवायु केंद्रा जवळून जात असताना अचानक समाधान शेषराव खिल्लारे यांच्या मोटारसायकल समोर तीन अनोळखी लोक आले. त्यांनी समाधान शेषराव खिल्लारे यांच्या मोटारसायकल समोर त्यांची मोटरसायकल आडवी लावली व समाधान शेषराव खिल्लारे यांना थांबविले. ते तिघेजन नशेत असल्याचे दिसून आले. त्या तिघापैकी एक जण म्हणाला की, थांब कोठे जायचे नाही असे म्हणून समाधान शेषराव खिल्लारे यांच्या गाडीची चावी काढून घेतली.

धारधार शस्त्राने समाधान शेषराव खिल्लारे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर वार केला. दुखापत होऊन रक्त निघु लागले. नंतर त्यांनी शिवीगाळ करून त्यापैकी एकाने पाठीत त्याच्या जवळील धारधार शस्त्राने वार करत तुझ्या जवळ जे काही असेल ते काढून दे असे म्हणत त्यांनी समाधान शेषराव खिल्लारे यांच्या जवळील ओपो मोबाईल (किंमत 10,000/-रु) व वायरलेस ब्ल्यु टुथ (किंमत 1000/-रु) काढून घेतले. नंतर समाधान शेषराव खिल्लारे हे त्यांना म्हणाले की मी तुम्हाला जे पाहिजे ते देतो असे म्हणुन पाकिट काढून दिले ज्यात 500 च्या 7 नोटा असे एकूण 3500/- रुपये होते.

नंतर ते जात असतांना समाधान शेषराव खिल्लारे हे त्यांना म्हणाले की पाकिटात महत्वाचे डाक्युमेंट आहेत तुम्ही पैसे घ्या पण माझे महत्वाचे डाक्युमेंट मला परत करा असे म्हटल्याने त्या तिघांपैकी एकाने पाकीटातील महत्वाचे डाक्युमेंट आणून दिले व ते तेथून त्यांच्या मोटरसायकवर निघून गेले. समाधान शेषराव खिल्लारे (वय 46 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा. भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी चोरट्यांवर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

त्यानंतर समाधान शेषराव खिल्लारे हे मोटारसायकल ढकलत कृषी विद्यापीठ बदनापूरकडे घेऊन जात असताना पोलिसांची नाईट राऊंडची जिप आली व त्यांनी विचारुस केल्याने समाधान शेषराव खिल्लारे यांनी त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. डाव्या दंडावर मार लागून रक्त निगत असल्याने पोलिसांनी समाधान शेषराव खिल्लारे यांना ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून नंतर पोलिसांसोबतच समाधान शेषराव खिल्लारे हे पोलीस ठाणे बदनापूर येथे पोहोचले व सदर तीन अनोळखी चोरट्यांविरोधात फिर्याद दिली.

समाधान शेषराव खिल्लारे (वय 46 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा. भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी चोरट्यांवर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!