छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

बदनापूरमध्ये राडा: औरंगाबाद पान सेंटरचे नाव संभाजीनगर करण्यावरून वाद, वाद पहायास गेलेल्या विद्यार्थ्याला १२ जणांनी रक्तबंबाळ होईस्तोवर मारले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. 17- आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणायला गेलेल्या मुलाला औरंगाबाद पान सेंटरमधील मुलांनी व इतर १० ते १२ जणांनी रक्तबंबाळ होईस्तोवर मारले. केक दुकानाच्या बाजूला असलेल्या औरंगाबाद पान सेंटरचे नाव संभाजीनगर करण्यावरून वाद सुरु होता. तो वाद पहायला हा विद्यार्थी गेला. सुरुवातीला त्याच्या ओळखीच्या दोघांना मारहाण सुरु झाली. त्यानंतर या विद्यार्थ्याला धारदार शस्राने वार करून जखमी करण्यात आले. विद्यार्थ्याने कशी बशी सुटका करून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना पाहून हल्लेखोर पसार झाले. यात तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये ICU वॉर्डात उपचार सुरु आहेत.

शिवम गणेश कोल्हे (वय 22 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. घोप्टेश्वर ता. बदनापूर जि. जालना) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर एम. जी. एम. हस्पिटल मधील एम. आय सी. यु. वार्डात उपचार सुरु आहेत.

जखमी शिवम गणेश कोल्हे याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, तो बी. एस. सी नरसिंग मध्ये नूर हॉस्पिटल कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक 16/04/2023रोजी रात्री साडे आठ नऊ वाजेच्या सुमारास शिवमच्या आईवडीलांचा अँनिवर्सरी (लग्न वाढदिवस) असल्याने बदनापूर येथे केक घेण्यासाठी तो गेला होता. शिवम बदनापूर येथील औरंगाबाद पान सेंटरच्या बाजुला केकच्या दुकानात केक घेण्यासाठी गेला होता.

तेव्हा औरंगाबाद पान सेंटर येथे गर्दी झालेली होती व भांडण चालू होते. तेथे शिवमच्या ओळखीचे व औरंगाबाद पान सेंटर मध्ये काम करणार्या मुलांचा वाद चालू होता म्हणून शिवम तेथे वाद बघण्यासाठी गेला. तेथे काही जण बोलत होते की औरंगाबाद पान टपरीचे नाव बदलून संभाजीनगर पान सेन्टर ठेवा असे म्हणाले असता त्यांच्यात एकमेंकाना शिवीगाळ चालू झाली.

शिवम तेथे उभे असताना त्यातील औरंगाबाद पान सेंटरमध्ये काम करणारे व ईतर 10 ते 12 लोकांनी शिवमला व त्याच्या ओळखीच्या लोकांना मिळून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या 10 ते 12 लोकांपैकी शिवमच्या पाठीत व डाव्या पायाच्या मांडीवर धारदार शस्राने वार केला. त्यामुळे शिवमच्या डाव्या पायाच्या मांडीतून व पाठीतून रक्तश्राव सुरु झाला. त्यानंतर शिवम कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून जोरजोरात वाचवा असे ओरडत ओरडत पोलीस ठाणे बदनापूर कडे पळत गेला.

तेथे गेल्यावर शिवमच्या मागे 10 ते 15 एका समाजाचे मुले आले. मात्र, ठाण्यात पोलिसांना पाहून ते परत गेले. पोलीस स्टेशनमध्ये शिवमला मेडीकल मेमो दिला. त्यानंतर काका विष्णू कुंडलीकराव कोल्हे यांनी शिवमला ग्रामीण रुग्नालय बदनापूर येथे घेवून गेले. तेथील डॉक्टरांनी शिवमला तपासून रेफर केले. त्यामुळे काका विष्णु कोल्हे यांनी शिवमला एमजीएम हॉस्पिटल (छत्रपती संभाजीनगर) येथे दाखल केले. सध्या शिवमवर उपचार सुरु आहे.

शिवम गणेश कोल्हे (वय 22 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. घोप्टेश्वर ता. बदनापूर जि. जालना) याने दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये औरंगाबाद पान सेंटरमध्ये काम करणारे मुले व इतर १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!