छत्रपती संभाजीनगर
Trending

आला उन्हाळा, स्वीमिंग पूलमध्ये पोहायला चला: विद्यापीठातील ’जलतरण तलाव’ पुन्हा सुरु होणार, लॉकडाऊन पासून होता बंद !!

गेल्या तीन वर्षांपासून ’लाकडाऊन’ नंतर पहिल्यांदाच सुरु होतोय तलाव

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  जलतरण तलाव पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षापासून ’लाकडाऊन’ नंतर पहिल्यांदाच हा तलाव सुरु होत आहे, अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी दिली.

क्रीडा विभागातील हा जलतरण लताव तात्काळ सुरु करण्याचे आदेश मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी १५ दिवसांपुर्वी दिले होते. त्यानंतर क्रीडा विभागाने जलतरण तलावाची दुरुस्ती करुन तलाव सुरु केला आहे.

या नूतनीकरणानंतर जलतरण तालाव सुरु होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते मंगळवारी दि.१८ सायंकाळी ५ः३० वाचजा होणार आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवेले व कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी सोमवारी दुपारी जलतरण तलवाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता रविंद्र काळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, प्रशिक्षण किरण शूरकांगळे, एस.जी.शिंदे, जितेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिकांसाठी मासिक शुल्क भरुन जलतरण तलाव उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विद्यार्थी व पुरुषांची तसेच विद्यार्थीनी व महिलांची वेगळी बॅच असणार आहे. संबधितांनी क्रीडा विभागात भेट देऊन नाव नोंदवावे, असे संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय दर्जाचा स्पर्धत व्हाव्यात : कुलगुरु

आपल्या क्रीडा विभागाला मोठी परंपरा असून आपण ती पुढे नेली पाहिजे. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंधेटिक अ‍ॅथेलेटिक ट्रॅक होत आहे. आगाती काळत स्विमिंग पूल देखील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात इतपत उत्तम व्हावा. अत्यंत व्यावसायिक पध्दतीने वापर व्हावा, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!