छत्रपती संभाजीनगर
Trending

बागेश्वर धाम यांच्या रामकथेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील हे रस्ते बुधवारपर्यंत राहणार बंद ! असे असतील पर्यायी मार्ग !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – धीरेंद्रकृष्ण शास्त्री बागेश्वर धाम यांच्या रामकथेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वेस्टेशन आणि बाबा पेट्रोलपंप परिसरातील काही रस्ते हे बुधवारपर्यंत (दि. ८) वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सूचवले आहे. या अधिसूचनेचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून या अधिसूचनेचे उल्लंघन करणारे वाहनधारक शिक्षेस पात्र राहिल, असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

दिनांक ०६/११/२०२३ ते ०८/११/२०२३ या कालावधीत धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्वर धाम यांची रामकथा आयोध्यानगरी मैदान, रेल्वेस्टेशन येथे आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर शहर परिसर व इतर शहरातून दररोज दोन ते अडीच लाख भावीक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांमध्ये महिला, लहान मुले, पुरूष व वयोवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सदर रामकथेसाठी भावीक पायी व आप आपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस, जीवितास धोका, अडथळा किवा गैरसोय होऊ नये म्हणून दिनांक ०६/११/२०२३ ते ०८/११/२०२३ पर्यंत दररोज सकाळी ०९.०० वाजेपासून रात्री २२.०० वाजेपर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंद करण्याबाबत पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी कार्यालयीन अधिसूचना काढली आहे.

वाहतूकीस बंद करण्यात येणारे मार्ग
1) बाबा पेट्रोलपंप ओव्हरबीज वरून रेल्वेस्टेशनकडे जाणारा व येणारा रोड
2) पंचवटी ते रेल्वेस्टेशन ओव्हरब्रीजखालून जाणारा रोड
3) रेल्वेस्टेशन ते पंचवटी चौकाकडे ओव्हरब्रीज खालून येणारा रोड
4) कोकणवाडी ते रेल्वेस्टेशन जाणाऱ्या रोडवरील बन्सीलालनगर कमान पासून ते आयोध्यानगरी पर्यंत जाणारा रोड

वरील बंद मार्गासाठी पर्यायी मार्ग
1) कार्तिकी चौकाकडून बाबापंप ओव्हरब्रीजवरून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहने ही बाबा पेट्रोलपंप, सेशन कोर्ट. कोकणवाडी मार्गे अथवा क्रांतीचौक मार्गे रेल्वेस्टेशनकडे जातील
2) रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने ही रेल्वेस्टेशन, कोकणवाडी, सेशनकोर्ट, सावरकर चौक, कार्तिकी चौक मार्गे येतील.
3) लोखंडीपुला कडून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहने ही लोखंडी पुल, पंचवटी चौक, कोकणवाडी चौक मार्ग रेल्वेस्टेशनकडे जातील सदर अधिसूचना ही पोलीस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. अधिसूचनाचा भंग करणारी व्यक्ती म.पो.कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील.

Back to top button
error: Content is protected !!