भोकरदन तालुक्यात गल्लीत फटाके फोडण्यावरून वादाचा भडका, कुऱ्हाड, लोखंडी रॉडने मारहाण ! तिघे जखमी, शेजाऱ्यांनी अवघड ठिकाणी मारले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – लहान मुले गल्लीत फटाके फोडण्यावरून मोठ्यांत वाद झाला. वादाचा भडका उडून शिवीगाळ व हाणामारीपर्यंत प्रकरण पुढे गेले. कुऱ्हाड, लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे यात तिघे जखमी झाले. एका जणाला अवघड ठिकाणी मार दिला. ही घटना दिनांक 05.11.2023 रोजी 06.00 ते 06.30 वाजेच्या सुमारास वालसावंगी (ता. भोकरदन, जि. जालना) गावात घडली.
सय्यद नदिम बशीर (वय 28 वर्षे व्यवसाय मजुरी रा वालसावंगी ता. भोकरदन, जि. जालना) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सरकारी दवाखाना बुलडाणा येथे उपचार सुरु आहे. जखमी सय्यद नदिम बशीर यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 05.11.2023 सांयकाळी 06.00 ते 06.30 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरी बसलेले होते.
दरम्यान, सय्यद नदिम बशीर यांच्या घरासमोर त्यांची व त्यांच्या भावाची मुले तसेच गल्लीतील लहान मुले गल्लीमध्ये फटाके फोडत होते. तेव्हा सय्यद नदिम बशीर यांच्या घरासमोर राहाणारे हे आले व म्हणाले की, तुम्ही येथे फटाके का फोडत आहेत. तसेच तुमचे मुले आरडाओरडा करत असून तुम्हाला दिसत नाही का, यानंतर वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर शिवीगाळ व नंतर हाणामारीत झाले.
लाठ्या काठ्या, कुर्हाड, रॉड घेवून ते आंगावर धावून आले. तेथे सय्यद नदिम बशीर यांचा भाऊ व इतर लोक आले होते. त्याचवेळी घरासमोरील लोकांनी सय्यद नदिम बशीर यांच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून जखमी केले. तसेच सय्यद नदिम बशीर यांचा भाऊ जमील यासही लोखंडी पाईपने व लोखंडी रॉडने डोक्यात व अवघड ठिकाणी मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी जखमी सय्यद नदिम बशीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ जणांवर पारध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe