छत्रपती संभाजीनगर
Trending

बागेश्वर धाम सरकारचे बॅनर फाडले, छत्रपती संभाजीनगर शहरात १० ठिकाणी बॅनर फाडून वातावरण खराब करण्याचे काम !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – सकल हिंदु जगजागरण समितीच्या वतीने आयोजित धीरेद्रं कृष्ण शास्त्रीजी महाराज (बागेश्वर धाम सरकार) यांचा दिव्य रामकथा सोहळा व दरबार निमीत्ताने छत्रपती संभाजीनगर शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. कालका पानटपरी जवळ, बायजीपुरा रोड येथील बॅनर फाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहतील एकूण १० ते ११ ठिकाणी बॅनर फाडले आहे. अशा पद्धतीने बॅनर फाडून शहरातील वातावरण खराब करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवन दिलीप सोनवणे (रा. कोटला कॉलनी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सकल हिंदु जणजागरन समिती छत्रपती संभाजीनगर समितीमध्ये सदस्य म्हणून ते कामकाज करतात. दि. 06/11/2023 रोजी ते दि. 08/11/2023 पर्यंत धीरेद्रं कृष्ण शास्त्रीजी महाराज (बागेश्वर धाम सरकार) यांचा दिव्य रामकथा सोहळा व दरबार असल्याने सकल हिंदु जगजागरण समिती, छत्रपती संभाजीनगर च्या वतीने दि. 18/10/2023 रोजी कालका पानटपरी जवळ बायजीपुरा रोड येथे धीरेद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज (बागेश्वर धाम सरकार) यांची प्रतिमा असलेले बॅनर एका लोखंडी फ्रेममध्ये लावले होते.

दि.20/10/2023 रोजी सायंकाळी 07:00 वाजेच्या सुमारास हिंदु जणजागरन समितीचे सदस्य पवन सोनवणे यांचा मित्रास समजले की, कालका पानटपरी जवळ, बायजीपुरा रोड, येथे रामकथा सोहळा व दरबार निमीत्ताने लावण्यात आलेले बॅनर फाडले आहे. ही माहिती समजताच हिंदु जणजागरन समितीचे सदस्य पवन सोनवणे यांनी सदर ठिकाणी जावून बघितले.

त्यानंतर शहरात लावलेले इतर बॅनर चेक केले असता शहरातील इतर ठिकाणी लावलेले बॅनर फाडलेले दिसून आले. प्रथम कालका पानटपरी जवळ बायजीपुरा रोड येथील बँनर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धार्मिक भावना दुखविण्याच्या उद्देशाने फाडून टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

बॅनर फाडून शहराचे वातावरण खराब करू नये- हिंदु जणजागरन समितीचे सदस्य पवन सोनवणे
कालका पान सेंटर, सिडको उड्डानपुलाखालील दोन बॅनर, एपीआय कॉर्नर, मोंढा नाका सिग्नल, सिल्लेखाना व हडको परिसरात चार ते पाच असे एकूण १० ते ११ ठिकाणचे बॅनर फाडल्याची माहिती आहे. धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर फाडून शहरातील वातावरण खराब करू नये, असे आवाहन हिंदु जणजागरन समितीचे सदस्य पवन सोनवणे यांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!