छत्रपती संभाजीनगर
Trending

जे जे प्लस हॉस्पिटल डॉ. जीवन राजपूत व संतोष बैनाडे यांच्यावर गुन्हा दाखल ! कर्णपुरा यात्रेत अवैधरित्या झाडावर जाहिरातीचे बॅनर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – मनाई असताना कर्णपुरा यात्रेत झाडावर अवैधरित्या बॅनर लावून जाहिरात करणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे.जे. प्लस हॉस्पिटल डॉ. जीवन राजपूत व संतोष बैनाडे अशी त्यांची नावे आहेत.

निळकंठ श्रीकृष्ण इश्वर (छावणी परिषद छत्रपती संभाजीनगर) हे छावणी परिषद येथे लँड क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. निळकंठ इश्वर यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, मुख्याकार्यकारी अधिकारी छावणी यांचे पत्र दि. 20/10/2023 रोजी प्राप्त झाले. दिनांक 20/10/2023 रोजी 11.00 वाजेच्या सुमारास स्वच्छता निरीक्षक / मुक्कादम विलास कुंदळ यांनी लेखी अहवाल दिला की छावणी परिक्षेत्र वार्ड क्र. 7 कर्णपुरा हनुमान मंदिराजवळ चप्पल बुट दुकानाच्या वर झाडावर डॉ. जीवन राजपूत व संतोष बैनाडे यांनी नवरात्र उत्सव कर्णपुरा यात्रास येणाऱ्या सर्व भाविक भक्ताचे हर्दिक स्वागत असे बॅनर लावले.

या बॅनरवर जे.जे. प्लस हॉस्पिटलची जाहिरात केलेली दिसून आली. सदरील यात्रेत बँनर / जाहिरात लावण्यास मनाई आहे. सदर बॅनर बाबत छावणी परिक्षेत्र कडून कायदेशीर परवानगी घेतली किंवा नाही याबाबत अभिलेख तपासले असता त्यांनी छावणी परिक्षेत्राची कोणतीही परवानगी न घेता कर्णपुरा यात्रेत हनुमान मंदिराजवळ अवैधरित्या बॅनर लावून परिसराचे विद्रुपीकरण केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

छावणी परिषदेचे क्लर्क निळकंठ श्रीकृष्ण इश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. जीवन राजपूत व संतोष बैनाडे यांच्यावर छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!