छत्रपती संभाजीनगर
Trending

शेतजमीन मोजणीच्या वादातून बाऊन्सरला मारहाण ! गोड बोलून रिक्षात बसवले, वैशाली ढाब्याजवळ नेले व मारहाण केली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – बाळापूर परिसर बीड बायपास येथील शेतजमीन मोजणीच्या वादातून बाऊन्सरला पुरवण्याचे काम करणार्या बाऊंसरला ६ ते ७ जणांनी मारहाण केली. फोन करून त्याला घराशेजारील रोडवर बोलावले. गोड गोड बोलून रिक्षात बसवले आणि वैशाली ढाब्याजवळ नेवून मारहाण केल्याचे फिर्यादी बाऊंसरने तक्रारीत म्हटले आहे. पिसादेवी रोड ते वैशाली ढाबा दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली.

कुलदीप लक्ष्मणराव निलापल्ले (वय38 वर्षे व्यवसाय- बाऊन्सरला रा. दत्तमेहर हाउसिंग सोसायटी पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर) असे जखमी बाऊंसरचे नाव आहे. निलापल्ले घाटी दवाखान्यातील कॅज्युल्टीमध्ये औषधोपचार घेत असताना त्यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते बाऊन्सरला पुरवण्याचे काम करतात. रवी दांडगे आणि विश्वनाथ खाडे हे फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांचे मित्र आहेत. दि. 20/09/2023 रोजी खड़ी रोड बाळापूर परिसर बीड बायपास येथे मित्र विश्वनाथ खाडे याच्या जमिनीची सरकारी मोजणी असल्याने फिर्यादी कुलदीप निलापल्ले आणि मित्र रवी दांडगे व त्यांचे सोबत दोन-तीन मित्र  मोजणीच्या ठिकाणी गेले.

परंतु तेथील आजुबाजुच्या लोकांनी विश्वनाथ खाडे यांच्या जमिनीची मोजणी होऊ न दिल्याने फिर्यादी कुलदीप निलापल्ले व त्यांचे मित्र तेथून निघुन आले. त्यानंतर सायंकाळी 05.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी कुलदीप निलापल्ले हे त्यांच्या घरी असताना रवि दांडगे याचा फोन आला व फोनवर बोलत असताना फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांच्या ओळखीचा देवा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने रवी दांडगे याच्या मोबाईलवरून फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना बोलला तू आम्हाला न सांगता मोजणीच्या ठिकाणी का आला असे म्हणून फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना शिवीगाळ करु लागला व विचारु लागला तू आता कुठे आहे ?

त्यावेळी फिर्यादी कुलदीप निलापल्ले हे त्यास म्हणाले मी सध्या माझ्या घरी आहे. त्यावेळी तो मला म्हणाला की तू बाहेर ये मी तुला बघुन घेतो. असे म्हणुन त्याने फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना घराजवळील पिसादेवी रोडवर बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादी कुलदीप निलापल्ले हे पिसादेवी रोडवर आले असता देवा व त्याचे 5 ते 6 मित्र रिक्षामध्ये तेथे आले आणि त्यांनी फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना रिक्षामध्ये बसवून रिक्षामध्येच हातचापटाने मारहाण करत करत वैशाली ढाब्याजवळ आणले.

त्याठिकाणी रिक्षातून बाहेर काढुन देवा व त्याचे 5 ते 6 मित्र या सर्वानी मिळुन फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना हातचापटाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्यांचेपैकी एकाने फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना काठीने डोक्यात मारल्याने फिर्यादी कुलदीप निलापल्ले हे खाली पडले. त्यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर थोड्याच वेळात फिर्यादी यांचा भाऊ यांना ही घटना माहित होताच ते आणि त्यांचा मित्र दोघांनी फिर्यादी कुलदीप निलापल्ले यांना औषधोपचार कामी घाटी दवाखाना येथे दाखल केले.

कुलदीप लक्ष्मणराव निलापल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व त्याचे 5 ते 6 मित्रांवर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!