संभाजीनगर लाईव्ह, दि. २२- मालमत्तेच्या वादातून ९ ते १० जणांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या हातगाडीच्या गल्ल्यातुन 20 हजार रुपये काढून घेतले. तुम्ही जर जागा खाली केली नाही तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना २० सप्टेंबर रोजी ११ वाजता व २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहागंज बडी मशिदच्या मागे, छत्रपती संभाजीनगर येथे घडली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अर्जुन कदम करीत आहे.
महेंद्र श्रीरामलाल जैस्वाल (५४, हॉटेल चालक, रा. एन ६, सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेसह तिचा पती व सात ते आठ अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन ते तीन महिलांचा समावेेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी व आरोपी यांचा मालमत्तेवरुन वाद असून यातील आरोपी यांनी फिर्यादी यांना जागा खाली करावी अशी वारंवार धमकी दिली. दि. 20/09/2023 रोजी 11.00 वाजेच्या सुमारास यातील आरोपी क्र. 1 या त्यांच्या सोबत सात ते आठ अनोळखींना हॉटेलवर घेवून गेल्या. फिर्यादीस सर्वांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यातील आरोपी नं. 1 यांनी तुम्ही जर जागा खाली केली नाही तर मी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली.
यातील सर्व आरोपीतांनी फिर्यादीच्या हातगाडीच्या गल्ल्यातुन 20 हजार रुपये काढून घेतले. व दि. 21/09/2023 रोजी सकाळी 10.30 वा. फिर्यादी यांची पत्नी या हॉटेलवर गेल्या असता यातील आरोपी क्र. 2 याने फिर्यादीच्या पत्नीच्या जवळ येवून तिच्या मनास लज्जा वाटेल अशा हेतून हात धरला. सोबत असलेल्या दोन ते तीन महिला यांनी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांना धमकी दिली की, तुम्ही जागा खाली करा नाहीतर आम्ही तुम्हाला जिवे मारून टाकू, महेंद्र श्रीरामलाल जैस्वाल यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe