महाराष्ट्र
Trending

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या ५ जणांवर गुन्हा दाखल !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – ऊसाला भाववाढ देण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बीड शहरातील बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित हे सध्या अजित पवार गटात असून जय भवानी साखर कारखाना त्यांचा आहे.

पोह भागवत सानप (पोलीस स्टेशन बीड शहर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 12.11.2023 रोजी 12.45 वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यासमोर सुभाष रोड, बीड येथे स्वाभिमानी शेतीकरी संघटनेचे काही कार्यकर्ते ऊसाला भाववाढ मिळण्यासाठी तसेच इतर मागणीसाठी तिव्र आंदोलन करणार आहेत.

ही माहिती मिळाल्याने पोह भागवत सानप, पोउपनि पवार, सफौ सिरसाट, पोना वायकर, पोकॉ सय्यद, पोकॉ परजणे, पोकॉ सय्यद तात्काळ सरकारी व खाजगी गाडीने घटनास्थळी पोहचले. त्यावेळी 13.15 वाजले होते. अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यामध्ये सहा लोक मिर्ची ठेचा भाकरी खात बसलेले दिसले. त्यांच्या सर्वांच्या शर्टच्या खिशाच्या वरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावलेला होता.

ते सर्वजण जय भवानी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडीत यांनी ऊसाला एफ.आर.पी पेक्षा 400 रुपये भाव वाढवून द्यावा या मागण्यासाठी आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी घेतली आहे काय या बाबत विचारले असता त्यांनी कळवले की, आम्ही आंदोलन करण्याची लेखी परवानगी घेतलेली नाही. त्यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे

1) राजु दत्तात्रय गायके वय-41 वर्ष, रा. सौंदाना ता. जि.बीड ( स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष ), 2) विलास हरिभाऊ खिसाडे वय-45 वर्ष, रा. गेवराई ता. गेवराई जि.बीड (स्वाभिमानी शेतकरी संघटना गेवराई तालुका अध्यक्ष), व सदस्य 3) दिनकर किसनराव रिंगणे वय-35 वर्ष, रा. खेर्डाखुर्द ता. माजलगाव जि.बीड, 4) उध्दव तुळशीराम साबळे वय-45 वर्ष, रा. खेर्डावाडी ता. गेवराई जि. बीड, 5). बळीराम मधुकर शिंदे वय-400 वर्ष, रा. लुखामसला ता. गेवराई जि.बीड, 6) अशोक बापुसाहेब भोसले वय-50 वर्ष, रा. तहसिल रोड गेवराई ता. गेवराई जि.बीड असे सांगितले.

यातील आंदोलनकर्ते यांनी आंदोलन करण्याची कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी न घेता बेकायदेशिरपणे आंदोलन करत असताना मिळून आले तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले असल्याची फिर्याद बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. या फिर्यादीवरून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!