महाराष्ट्र
Trending

झेडपी बांधकाम उपविभागाचे कार्यालय पाडले, रस्ता रुंदीकरणात अनागोंदी ! रस्ते विकास महामंडळ अधिकारी व परतूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १३- रोडच्या मध्यभागापासून निश्चित केलेल्या जागेपेक्षा ज्यास्तीचा भाग पाडल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यातील परतूर शहरात घडली. झेडपी बांधकाम उपविगाच्या कार्यालयातील चार रुम अधिकच्या पाडल्या. याशिवाय कंपाऊंड व एक मोठे झाडही रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आले. रोडच्या मध्यभागापासून १५ मीटर कार्यालयाची इमारत पाडण्याचे मार्किंग करण्यात आले होते. परंतु निश्तित केलेल्या जागेपेक्षा जास्तीचे १२ मीटर जागेमधील कार्यालयातील रुम पाडण्यात आल्याने रस्ते विकास महामंडळ आणि नगर परिषदेची अनागोंदी समोर आली आहे. याप्रकरणी रस्ते विकास महामंडळ अधिकारी व परतूर नगर परिषदेच्या अधिकारी व अतिक्रमण धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष सखाराम सुगंधे (वय 53 वर्षे व्यवसाय उपअभियंता जि.प. (बां) उपविभाग परतूर जि. जालना रा. माउली नगर जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, उपअभियंता जि.प. (बां) उपविभाग परतूर येथे मागील एक वर्षापासून ते कार्यरत आहेत. जि.प. (बां) उपविभागाचे कार्यालय रेल्वे स्टेशन समोर परतूर ते वाटूर रोडवर असून कार्यलयास दिनांक 18.10.2023 प्रमाणे कार्यकारी अभियंता (बांधकाम) जिल्हा परिषद जालना यांचे जालना जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग 548C मंठा ता. सरहद ते परतूर महामार्गावरील परतूर शहरातील रस्ता बांधकामध्ये बांधकाम उपविभाग, परतूरची इमारत येत असल्याने दोन दिवसांत सदरील इमारत पोलीस बंदोबस्तात पाडणे बाबत या कार्यालस कळवले.

कार्यालयीन दप्तराची योग्य ठिकाणी जतन करण्यात यावी असे पत्र प्राप्त झाल्याने उपअभियंता संतोष सुगंधे यांनी त्यांच्या कार्यालयातील सामान हे मॉडेल स्कूल आंबा येथे स्थलांतर केले. दिनांक 27/10/2023 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास उपअभियंता संतोष सुगंधे व त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता आदित्य आनिल बुलबुले, गौरव सतिष भंडे, आकाश बरे, दासारवाड साहेब हे कार्यालयाच्या आवारात हजर होते. रस्ते विकास महामंडळ जालना यांनी राष्ट्रीय महामार्ग 548C मंठा तालुका सरहद ते परतूर (परतूर येथील रेल्वे स्टेशन) समोरील महामार्गात येणारी उपअभियंता संतोष सुगंधे यांच्या कार्यालयाची इमारत येत असल्याने निश्चित केलेल्या रोडच्या मध्यभागापासून १५ मीटर कार्यालयाची इमारत पाडणे आवश्यक होते.

परंतु निश्तित केलेल्या जागेपेक्षा जास्तीचे १२ मीटर जागेमधील कार्यालयाच्या इमारती मधील 3.60×3.60 मीटरची एक रुम, 2.00×1.50 मीटरची एक रुम, 7.30×4.10 मीटरची एक रुम व 5.40×4.60 मीटरचे गॅरेजची एक रुम, व 34 मीटरचे कंपाउंड असे जास्तीची इमारत पाडून जि.प.बांधकाम उपविभाग परतूर कार्यालयाचे व कार्यालयाच्या परीसरातील एक मोठे लिंबाचे झाड तोडून नुकसान करण्यात आले.

त्यामध्ये रस्ते विकास महामंडळ अधिकारी कोटेचा उपअभियंता व इतर कर्मचारी यांनी आणलेल्या मेगा ईन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची एक पोकलेंड आणि एक जेसीबी मशिनरीज होत्या. तसेच नगर परिषद कार्यालय परतूरचे अधिकारी अनिल पारीख व इतर कर्मचारी हे सुद्धा इमारत पाडण्याकरीता हजर होते. १२ मीटर जास्तीची इमारत पाडलेल्या जागी सध्या मुकंद जाजू (रा. परतूर) यांनी अतिक्रमण केलेले आहे.

याप्रकरणी संतोष सखाराम सुगंधे (वय 53 वर्षे व्यवसाय उपअभियंता जि.प. (बां) उपविभाग परतूर जि. जालना रा. माउली नगर जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रस्ते विकास महामंडळ अधिकारी कोटेचा उपअभियंता व इतर कर्मचारी तसेच नगर परिषद कार्यालय परतूरचे अधिकारी अनिल पारीख व इतर कर्मचारी यांच्यावर परतूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!