महाराष्ट्र
Trending

बीडमध्ये मोटारसायकलच्या ब्रेकच्या केबलने भावाला रपारप मारले ! पत्नीला मारहाण केली म्हणून भावाने राग काढला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- माझ्या पत्नीला का मारहाण केली असे म्हणत भावाला मोटारसायकलच्या ब्रेकच्या केबलने मारहाण केल्याची घटना अंमळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बीड ते नगर रोडवरील पिंपळवंडी शिवारात घडली.

कृष्णा शिवाजी भनगे (वय 42 वर्षे रा. भनगेवस्ती हांडेवाडी तहत पिंपळवंडी ता. पाटोदा जि. बीड) असे जखमीचे नाव आहे. कृष्णा शिवाजी भनगे यांची पिंपळवंडी येथे नगर ते बीड रोडच्या कडेला जागा असून त्याठिकाणी एक गाळा असून तो भाड्याने दिलेला आहे. दि. 08/08/2023 रोजी सकाळी 09.45 वाजेच्या सुमारास कृष्णा शिवाजी भनगे हे त्यांच्या पिंपळवंडी येथील दुकानाच्या समोर उभे असताना त्यांचा भाऊ युवराज शिवीजी भनगे (रा. भनगेवस्ती हांडेवाडी तहत पिंपळवंडी) त्याचे मेव्हणे सोमीनाथ गहीनीनाथ शेळके व ऋषीकेष गहीनीनाथ शेळके (दोन्ही रा. चंद्रेवाडी ता. पाटोदा जि. बीड) हे त्याठिकाणी आले.

कृष्णा शिवाजी भनगे यांचा भाऊ युवराज शिवाजी भनगे हा मोटारसायकलच्या ब्रेकचे केबल हातात घेवून आला व कृष्णा शिवाजी भनगे यांना म्हणाला की, माझ्या पत्नीस तू हाणमार का केली असे कारण काढून त्याने केबलने कृष्णा शिवाजी भनगे यांच्या उजवे पायावर मारून जखमी केले व सोमीनाथ शेळके व ऋषीकेष शेळके यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने व चापटाने तोंडावर मारून मुक्कामार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली. त्याठिकाणी कृष्णा शिवाजी भनगे यांचे वडील व गावातील लोकांनी भांडणाची सोडवासोडव केली.

याप्रकरणी कृष्णा शिवाजी भनगे (वय 42 वर्षे रा. भनगेवस्ती हांडेवाडी तहत पिंपळवंडी ता. पाटोदा जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार युवराज शिवीजी भनगे (रा. भनगेवस्ती हांडेवाडी तहत पिंपळवंडी), सोमीनाथ गहीनीनाथ शेळके, ऋषीकेष गहिनीनाथ शेळके (दोन्ही रा. चंद्रेवाडी ता. पाटोदा जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!