महाराष्ट्र
Trending

जालन्याच्या पाटबंधारे विभागातील दोन क्लार्क ११ हजारांची लाच घेताना पकडले ! सातव्या वेतन आयोगाची रक्कम व निवृत्तीचे लाभ देण्यासाठी सेवानिवृत्त चौकीदाराकडून घेतली लाच !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण आणि सातवे वेतन आयोगाचा चौथा हफ्ता याचे बिल काढून देण्यासाठी सेवानिवृत्त चौकीदाराकडून ११ हजारांची लाच घेताना जालना कार्यकारी अभियंता पाटबंधारे कार्यालयातील दोन लिपीकांना रंगेहात पकडण्यात आले.

बालाप्रसाद एकनाथराव रनेर (वय 47 वर्षे, पद – प्रथम लिपीक, वर्ग – 3, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कार्यालय जालना. रा. हनुमाननगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर), विजय हरीसिंग सोळंकी (वय 34 वर्षे, पद – वरीष्ठ लिपीक, वर्ग – 3, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कार्यालय जालना रा. पाटबंधारे विभाग काॅलनी जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे पाटबंधारे विभाग कार्यालय जालना येथून चौकीदार पदावरून दि. 31/03/2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण आणि सातवे वेतन आयोगाचा चौथा हफ्ता असे बील काढून देण्यासाठी आरोपी सोळंकी याने यापूर्वी 20,000 रुपयेची मागणी करुन 10,000 रुपये स्वीकारले होते.

आज दि. 08/08/2023 रोजी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग कार्यालय जालना येथे सर्व बिले काढून देवून सातवे वेतन आयोगाचे हप्त्याचा चेक देण्यासाठी आरोपी बालाप्रसाद रनेर याने पंचासमक्ष स्वतः 4,000 रुपये लाचेची मागणी केली, तसेच आरोपी सोळंकी याने जीआयएसचे बील काढण्यासाठी पंचासमक्ष स्वतः 7,000 रुपये लाचेची मागणी केली.

आज दिनांक 08.08.2023 रोजी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यालयाचे परिसरात जालना येथे पंचासमक्ष आरोपी बालाप्रसाद रनेर याने 4,000 रुपये स्वीकारले. तसेच आरोपी सोळंकी याने 7,000 रुपये स्वीकारले. दोन्ही आरोपींकडून 11,000 लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना, सापळा पथक – ज्ञानदेव जुंबड, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!