महाराष्ट्र
Trending

बीड जिल्ह्यातील कला केंद्रावर पोलिसांचा छापा, दबाव टाकून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार उघडकीस ! डिजेवर १५ महिलांचा डान्स, पैशांची उधळण, दारूच्या बाटल्या, १७ नामांकित लोकांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – बीड जिल्ह्यातील कलाकेंद्रावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या कला केंद्रावर चार रुममध्ये डीजेच्या आवाजात नृत्यांगणावर पैशांची उधळण सुरु होती. १५ नृत्यांगणा महिला व १७ शौकीनांना पोलिसांनी पकडले. एका अल्पवयीन मुलीवर दबाव टाकून बलात्कार झाला असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या अल्पवयीन मुलीने पोलिसांसमोर सर्व हकीकत कथन केली. दरम्यान, घटनास्थळावर दारुच्या बाटल्या, उधळण केलेल्या नोटा आणि बरेच काही पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी नृत्य करणार्या महिला आणि ते पाहण्यासाठी आलेले पुरुष अशा एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल केला. केज तालुक्यातील उमरी येथील कलाकेंद्रावर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, हे कलाकेंद्रात एका पक्षाच्या जिल्हा प्रमुखाची पार्टनरशिप असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही धडक कारवाई केली. महालक्ष्मी कला केंद्राचे मॅनेजर याच्याकडून पोलिस अधीकची माहिती घेत आहेत.

सदर थेटर (कलाकेंद्र) पार्टनरशीप मध्ये चालवणारे रत्नाकर शिंदे हे एका पक्षाचे जिल्हा प्रमुख असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सदर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळते. केज पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, महालक्ष्मी कला केंद्र उमरी हे उशीरा पर्यंत चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

याची खातरजमा करण्यासाठी पोलिस पथकाला वरिष्ठांनी निर्देश दिले होते. माहिती मिळताच पोलिस पथक शासकीय व खाजगी वाहनाने महालक्ष्मी कला केंद्र उमरी येथे रवाना झाले. महालक्ष्मी कला केंद्रामध्ये 4 वेगवेगळ्या बैठक रुमध्ये डिजेच्या आवाजावर नृत्य चालू होते. त्यावेळी काही लोक नृत्यांगणांवर पैसे उधळत होते तसेच रूम मधील फर्शीवर खाली नोटा पडलेल्या होत्या. पोलिसांनी सदर रुममध्ये प्रवेश करून तेथील डीजे बंद करून तेथील नृत्य बंद केले.

सदर थेटर कलाकेंद्र पार्टनरशीपमध्ये रत्नाकर शिंदे चालवतात अशी माहिती पोलिसांना यावेळी मिळाली. शिंदे यांची स्कॉर्पीओ आणि इनोव्हा गाडी कला केंद्र पत्राच्या शेड मध्ये मिळून आल्या आहेत. तसेच त्याचे राहते घरातील बेड रूम मध्ये iphone मिळून आला आहे. सदर ठिकाणचा घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पंचासमक्ष केला. सदर घटनास्थळावरून दारुच्या बाटल्या, निरोधची पाकीटे, बैठक रुममधील फर्शीवर पडलेल्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

गुटखा पुड्या, दारूच्या रिकाम्या बाटल्याही घटनास्थळावर पोलिसांना दिसून आल्या. सदर महालक्ष्मी कला केंद्रामध्ये इतर रुममध्ये मिळून आलेल्या महिलांच्या आधार कार्डची पाहणी पोलिसांनी केली. त्यापैकी महालक्ष्मी नृत्य कला केंद्रामधील नृत्य करणार्या एका मुलीकडे विचारपुस केली असता तिने तिचे लैंगीक शोषण झाल्याची हकीगत पोलिसांसमोर कथन केली. यानुसार पोलिसांनी नोंद घेतली.

या कला केंद्रावर एकूण १५ महिला, मुली मिळून आल्या. तसेच महालक्ष्मी कला केंद्रातील नृत्य पाहण्यासाठी आलेले १७ जण मिळून आले. केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!