भोकरदन पंचायत समिती कार्यालयातच घेतली ग्रामपंचायत सदस्याकडून लाच ! विहीर खोदकामाचे मस्टर काढण्यासाठी तांत्रिक सहायकाने ७ हजार घेतले !!
संभाजीनगर लाईव्ह, १७- विहीर खोदकामाचे मस्टर काढण्यासाठी तांत्रिक सहायकाने ग्रामपंचायत सदस्याकडून ७ हजारांची लाच घेतली. भोकरदन पंचायत समिती कार्यालयातच लाच घेतल्याने शायकीय कार्यालयांना भ्रष्ट्राचाराची किती कीड लागली आहे, हे यावरून स्पष्ट होते. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
प्रशांत रामेश्वर दहातोंडे (वय 39 वर्ष, पद – तांत्रिक सहायक (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन, ता.भोकरदन,जि.जालना) व सतीश रामचंद्र बुरंगे (वय 29 वर्ष, पद- संगणक परिचालक (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन, ता.भोकरदन, जि.जालना) अशी आरोपींची नावे आहेत. यातील तक्रारदार हे ग्राम पंचायत सदस्य आहेत. सदर सार्वजनिक विहीर सन 2021 मंजूर झालेली होती. सदर मंजूर विहीर खोदकामचे अकुशल मजूर यांचे थकित मस्टर काढण्यासाठी आरोपी दहातोंडे याने पंचासमक्ष 7000 रुपयांची लाचेची मागणी केली.
तसेच आरोपी बुरंगे यानेसुद्धा पंचासमक्ष 3000 रुपये लाचेची मागणी केली आहे. सदर प्रकरणात दहातोंडे याने आज पंचा समक्ष 7000 रुपये पंचायत समिती कार्यालय भोकरदन येथे स्वतः स्वीकारले. तर यातील आरोपी बुरंगे याने लाचेची रक्कम घेतली नाही. आरोपी दहातोंडे यास पंचा समक्ष स्वतः 7000 रू. स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. तर आरोपी बुरंगे याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेऊन भोकरदन पोलीस स्टेशन, जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व तपास अधिकारी – किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. जालना, सापळा पथक – पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe