महाराष्ट्र
Trending

भोकरदन तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक लाच घेताना चतुर्भुज ! जात प्रमाणपत्राची फाईल तहसिलदारांच्या मार्फतीने SDM कार्यालयास पाठवण्यासाठी ३ हजार घेतले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१- जातीच्या प्रमाणपत्राची फाईलीची पुर्तता करून ती तहसीलदारांच्या मार्फत एसडीएम कार्यालयाला पाठवण्यासाठी ३ हजारांची लाच घेताना भोकरदन तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक रंगेहात पकडला.

श्रीकृष्ण अशोक बकाल (वय 32 वर्ष, महसुल सहाय्यक, तहसील कार्यालय, भोकरदन रा. शिंगने नगर, देउळगाव राजा जि.बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे नातेवाईकांचे चार व्यक्तींचे भिल्ल तडवी जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पुर्तता करून तहसीलदार यांच्या मार्फतीने SDM कार्यालय येथे पाठवण्यासाठी प्रत्येकी 300/- रु प्रमाणे असे एकूण 1200/- रुपये व यापूर्वी 8 फाईली पाठविल्याचा मोबदला म्हणून 2400/- रुपये असे एकूण 3600/- रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती 3000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करुन 3000/- रुपये लाच पंचा समक्ष स्वीकारली असता जागीच पकडण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, विशाल खांबे, अप्पर पोलीस अधीक्षक, किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व तपास अधिकारी – एस.एस.शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.जालना, पोलीस अंमलदार गणेश चेके, गणेश बुजाडे,जावेद शेख, जमदाडे, चालक सुभाष नागरे ला.प्र.वि.जालना यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!