छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

बिडकीनजवळ दुचाकीस्वाराला ११ जणांनी बेदम मारले ! महिलेला गाडीचा धक्का लागला म्हणून संतप्त लोकांनी चोपले, १२ जणांवर गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – दुचाकीचा महिलेला धक्का लागल्याने दुचाकीस्वाराला ११ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना चितेगाव येथिल कॅनरा बँकेच्या थोडे पुढे बिडकीनजवळ घडली. याप्रकरणी जखमी दुचाकीस्वाराने दिलेल्या फिर्यादीवरून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमीवर बिडकीनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

हरिश्चंद लिंबाजी आवारे (वय 36 वर्षे, व्यवसाय शेती रा. पोटोदे वडगाव ता पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) असे मारहाणीत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर वरद हॉस्पटिल अॅण्ड आय.सी.यु बिडकीन मधील जनरल वार्डात उपचार सुरु आहेत. जखमी आवारे यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 16/10/23 रोजी आवारे व त्यांचा मित्र सुरेश काशीनाथ ढोले हे दोघे होंडा अॅक्टीवावर टोलनाका येथून पाटोदे वडगाव येथे जाण्यासाठी निघाले.

आवारे हे गाडी चालवत होतो. चितेगाव येथिल कॅनरा बँकेच्या थोडे पुढे जात असतांना संध्याकाळी साडे सात ते पावणे आठच्या सुमारास गाय समोरून आल्याने आवारे यांच्या दुचाकीचा चितेगावजवळ एका महिलेला धक्का लागला. त्यावेळी एका जणाने आवारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने गावातील लोकांना बोलविले. घटनास्थळावर जमा झालेल्या लोकांनी आवारे व त्यांचा मित्र सुरेश काशिनाथ ढोले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आवारे यांचा मित्र सुरेश ढोले हा त्या ठिकाणाहून पळून गेला. भांडणामध्ये आवारे यांच्या डाव्या कानाच्या पाठीमागे दोन्ही खांद्यावर, डोळ्याजवळ पाठीवर दोन्ही हाताला डोक्याला मुक्का मार लागला आहे. आवारे हे पोलिसांना फोन लावत असतांना एका जणाने त्यांचा फोन जमिनीवर आपटून नुकसान केल्याचे आवारे यांनी जवाबात म्हटले आहे. आवारे यांच्यावर बिडकीन येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ जणांवर बिडकीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!