महाराष्ट्र
Trending

पंचायत समितचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात ! नमूना नंबर ८ अ वर घेतलेली बोगस नोंद कमी करण्याचा अहवाल सादर करण्यासाठी लाच घेतली !!

संभाजीनगर, दि. १९ – पंचायत समितचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात अडकले नमूना नंबर ८ अ वर घेतलेली बोगस नोंद कमी करण्याचा अहवाल सादर करण्यासाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

१. भागवत पांडुरंग जोगदंड, वय 57 वर्षे , विस्तार अधिकारी, (वर्ग -३) पंचायत समिती परंडा , जि.धाराशिव. पत्ता-रौळस गाव ,पो. खडकी घाट, तालुका, जिल्हा बीड., 2) प्रदीप मधुकर जाधव, वय 56 वर्षे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सिरसाव तालुका परंडा, जिल्हा धाराशिव, रा. महालिंगरायवडी, तालुका उमरगा, जि. धाराशिव. (वर्ग -३) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचे नावे असलेली वाकडी शिवारातील शेत गट नंबर 332 मधील 35 गुंठे जमिनिपैकी 2 गुंठे जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ग्रामपंचायत पातळीवर 8 अ मध्ये मारुती सोनमाळी याचे नावे घेतलेली बोगस नोंद करून घेतलेली जागा खुली करून देण्याचे अर्जावर गट विकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी यातील आरोपी क्र.1 भागवत पांडुरंग जोगदंड याने आरोपी क्र.2 प्रदीप मधुकर जाधव यांचे मार्फतीने यापूर्वी 5000 /- रूपये मागणी करून 3000 /- रूपये स्वीकारले.

तसेच आज रोजी यातील आलोसे क्र.1 भागवत पांडुरंग जोगदंड व प्रदीप मधुकर जाधव यांनी पंच साक्षीदारा समक्ष यापूर्वी 3000 /- रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 2000/- रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष करून 2000/- रूपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून आलोसे क्र.1 भागवत पांडुरंग जोगदंड यांनी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली. त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे परांडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा पर्यवेक्षण अधिकारी – सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. धाराशिव, सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोलीस अंमलदार इफतीकार शेख,विष्णू बेळे,विशाल डोके यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!