पैठण
Trending

बिडकीनच्या दरोड्यातील आरोपी ३२ वर्षांनी जेरबंद ! पोलिसांनी वेशांतर करून नेवासा तालुक्यातून घेराबंदी करून आवळल्या मुसक्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- मागील ३२ वर्षांपासून दरोड्याच्या गुन्हयातील फरार आरोपीला बिडकीन पोलिसांनी वेशांतर करून भालगाव (ता. नेवासा) येथून शिताफिने जेरबंद केले. आरोपी अशोक विनायक वर्डे (वय ५३ वर्षे रा. भालगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) हा पोलीसांना मागील ३२ वर्षांपासून त्यांचे स्वतःचे अस्तित्व व नाव लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून पोलीसांना गुंगारा देत होता. पोलीसांनी त्यांला अत्यंत सचोटीने व कसोशिने व कौशल्यपूर्ण पध्दतीने जेरबंद केले आहे.

पोलीस ठाणे बिडकीन अंतर्गत गाढेगाव गंगापूर येथील फिर्यादी मुरलीधर एकनाथ चनघटे यांचे शेतवस्तीवरील घरी दिनांक १५/१०/१९९१ रोजी रात्री ०१:३० वाजेच्या सुमारास दरोडा पडला. ५ अज्ञात दरोडेखोरांनी लाठ्या, काठ्या, गज, कु-हाडीने फिर्यादी व फिर्यादीची पत्नी, चुलती व शेतवस्तीवरिल राहणारे सुरेश पवार, रमेश पवार यांना मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, घडयाळ, व इतर साहित्य असे एकूण ३२५०/- रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. यावरून पोलीस ठाणे बिडकीन येथे दिनांक १६/१०/१९९१ रोजी गुरंन १३४ / १९९१ भादंवी कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दरोड्याच्या गुन्हयाचा तत्कालीन पोलीसांनी तपास करून ५ आरोपी निष्पन्न केले. यातील तीन आरोपी १) मनोहर संपत बर्डे २) अंताराम मनोहर बडे (दोघे रा. कमलापुर ता. श्रीरापुर) ३) ओकांर दगडु माळी (रा.खलाल पिंपी जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले होते. परंतु यातील आरोपी अशोक विनायक बर्डे व सुभाष बाबुराव बर्डे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.

या आरोपीताचा पोलीस ठावठिकाणा शोधून काढण्याचा कसोशिने प्रयत्न करत होते. परंतु आरोपी हा पोलीसांना मागील ३२ वर्षांपासून त्यांचे स्वतःचे नाव व अस्तित्व लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून गुंगारा देत होता. तरीही पोलीस आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत असताना बिडकीन पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की पाहिजे असलेला आरोपी अशोक विनायक बर्डे हा पुनतांबा (ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) येथील विटभटीवर स्वतःचे नाव बदलून तुकाराम असे नाव धारण करून या नावाने मुजरीचे काम करून राहत आहे.

या मिळालेल्या माहितीच्या आधारे बिडकीन पोलीसांचे पथकांने तात्काळ पुनतांबा (ता. श्रीरामपूर) येथील विटभटीवर आरोपीचा शोध सुरू केला परंतु पोलीस त्याचा शोध घेत असल्याबाबत त्याला सुगावा लागताच त्याने तेथून पळ काढला. तरीही पोलीसांनी त्याचा माग सोडला नाही व परत त्याच्या शोधात पथक असतांना अशोक विनायक बर्डे हा त्याचे मुळ गावी भालगाव (ता. नेवासा) येथे पैसे घेण्यासाठी येणार असून पैसे घेवून कायमचा फरार होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून दिनांक ०६/०६/२३ रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास आरोपीच्या घराचे परिसरात वेशांतर करून सापळा लावला. संपूर्ण परिसरात पाळत ठेवून आरोपी हा घराचे दिशेने येताना दिसला यावेळी त्याचे ओळखी बाबत खात्री झाल्याने बिडकीन पोलीसांनाचे पथकांने घेराव टाकून त्याचेवर झडप घालून त्याला जेरबंद केले आहे.

आरोपी अशोक विनायक वर्डे (वय ५३ वर्षे रा. भालगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) हा पोलीसांना मागील ३२ वर्षांपासून त्यांचे स्वतःचे अस्तित्व व नाव लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून पोलीसांना गुंगारा देत होता. पोलीसांनी त्यांला अत्यंत सचोटीने व कसोशिने व कौशल्यपूर्ण पध्दतीने जेरबंद केले आहे. ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश सुरवसे, पो.उप.नि. मनेष जाधव, पोलीस अंमलदार संदीप धनेधर, अमोल मगर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!