फुलंब्री
Trending

फुलंब्री पोलिसांची मोठी कारवाई, २ हजार लिटर बनावट दारू बनवण्याच्या स्पिरीटसह ट्रक पकडला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – जळगावहून येत असलेला ट्रक फुलंब्री पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाजवळ पकडला. या ट्रकमध्ये 2 हजार लिटर बनावट दारू बनवण्याच्या स्पिरीटसह एकूण 23 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फुलंब्री पोलीसांची ही कारवाई केली. याप्रकरणी नाशिकचा ट्रक चालक व त्याचा सहकारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाणे फुलंब्री येथील पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांना दिनांक 20/02/23 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका ट्रकमधून बनावट दारू बनविण्याकरिता वापरले जाणारे स्पिरीट हे अवैध रित्या जळगाव कडून येत आहे. तो ट्रक फुलंब्रीपासून पुढे जाणार आहेत. ही खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून तात्काळ फुलंब्री पोलीसांनी रात्री 07:30 वाजता ग्रामीण रुग्णालयाजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहिती व वर्णनाचा ट्रक येताना दिसताच पोलीसांनी त्याला थांबवण्याचा इशारा देवून तो थांबवला.

ट्रक (एमएच 31 सी.बी. 0748) बाजूला घेवून चालकास विश्वासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांना त्याचे नाव किरण मधुकर थोरकर (वय 28 वर्ष रा. झोडगे ता. मालेगाव जि. नाशिक) व त्याचा सहकारी प्रविण लोटक गंवादे (रा. जाजवाडे ता. मालेगाव जि. नाशिक) यांना विचारपुस करता ते पोलीसांना उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले. यावरून त्यांच्यावर अधिक संशय बळावला.

ट्रकची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यामध्ये  निळ्या रंगाचे उग्रवास येत असलेल्या 200 लिटर क्षमतेचे 10 ड्रम स्पिरिटने (बनावट दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे) भरलेले मिळून आले. त्याची किंमत 08,00,000 /- ( आठ लक्ष रुपये) तसेच 23 बॉक्स मध्ये झाकणे त्यांची किंमत 23,000/- रूपये व ट्रक 15,00,000/-  असा एकूण 23,23,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रक चालक व त्याचा सहकारी यांच्याविरूध्द पोलीस ठाणे फुलंब्री येथे भादंवी कलम 328 सह कलम 65 (अ) (फ) महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम प्रमाणे दाखल करण्यात येवून पुढील तपास पोलीस करित आहेत. ही कारवाईमनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पो.उप.नि. धुळे, पोलीस अंमलदार आर.पी. सोनुने, मुजीब सय्यद, अनिल शिंदे, संतोष डोंगरे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!