छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा परीक्षेच्या कामावर बहिष्कार, 20 फेब्रुवारीपासून सर्व विद्यापीठ व महाविद्यालये बेमुदत बंदची हाक !!

प्रलंबित मागण्यांसाठीची शिक्षण मंत्री यांच्या दालनामधील बैठक वांझोटी

संभाजीनगर लाईव्ह, दि:- 02 – शिक्षण मंत्री यांच्या दालनामध्ये 2 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती सोबतच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निष्कर्ष न निघाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात व विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांचा काम बंद बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

1. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वत लागू करणे.

2. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10 :20 :30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे.

3. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 चे प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे.

4. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे
5. 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
6. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे.

या प्रमुख मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे आज आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकून आजपासून परीक्षेचे काम बंद आंदोलनाची सुरुवात करून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

यावेळी डॉ. कैलास पाथ्रीकर, प्रकाश आकडे, विजय दरबस्तवार, दिलीप भरड, डॉ.विष्णू क-हाळे, रमेश मोहिते, रवि भिंगारे, अर्जुन खार्ड्रे, नारायण पवार, अशोक लग्गड, संजय राजपुत, दिनकर जगदाळे, पार्वतीबाई खेत्रे यासह सहकारी उपस्थित होते.

  • असे असेल आंदोलनाचे टप्पे-
  • 2 फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार
  • 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी दोन ते अडीच अवकाश काळात निदर्शने
  • 15 फेब्रुवारी 2023 रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे
  • 16 फेब्रुवारी 2023 रोजी एका दिवसाचा लाक्षणिक संप
  • 20 फेब्रुवारी 2023 पासून सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय बेमुदत बंद

Back to top button
error: Content is protected !!