छत्रपती संभाजीनगर
Trending

सिल्लोड अजिंठा रोडवर ३ लाखांच्या गुटक्यासह भोकरदन तालुक्यातील दोघांना पकडले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पोलिस पथकाने आज धडाकेबाज कारवाई केली. अजिंठा – सिल्लोड रोडवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटक्याची वाहतूक करणारी स्वीफ्ट कार पोलिसांनी पकडली. अजिंठा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा गुटका पकडण्यात आला. शेख मुस्तकीम शेख जाफर व शेख मोहसीन शेख बुडण (दोघे राहणार भोकरदन जिल्हा जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24-9-2023 रोजी अजिंठा ते सिल्लोड रोडवर वाघुर नदीच्या पुलावर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (क्रमांक एम एच 46 डब्ल्यू 77 51) मध्ये 1.शेख मुस्तकीम शेख जाफर 2. शेख मोहसीन शेख बुडण (दोघे राहणार भोकरदन जिल्हा जालना) हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घेवून जात असताना पकडले.

राजनिवास, विमल पान मसाला, मसाला तंबाखू एकूण 2,90,106/-गुटखा व 500000/-किंमतीची स्विफ्ट डिजायर कार असा एकूण 7,90,109/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाई करता त्यांना अजिंठा पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कालवणीया, सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक सतीश वाघ स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे पोहे कासम शेख ,पोहे. विठ्ठल डोके, पोहेकॉ गोपाल पाटील यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!